‘दररोज आमची आर्धी उर्जा तर कामावर जाण्यासाठी आणि कामावरून परत घरी पोहचण्यासाठी खर्च होते आणि यात खूप वेळ जातो,’ ही तक्रार नोकरी करणारा जवळपास प्रत्येक नोकरदार करत असल्याचं दिसतं. कारण नोकरी करणाऱ्यांचा किंवा कामानिमित्त लोकल किंवा बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा दिवसभरातील बराचसा वेळ प्रवासात जातो. परंतु आता मेट्रोचा विस्तार होतोय, मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरातील ज्या भागात लोकल ट्रेन पोहोचत नाही त्या भागांत मेट्रो मार्ग उभारले जात आहे. मात्र या सोयी सुविधा होत असताना काय नुकसान होतंय याचा कुणी विचार करत नाही. सध्या सोशल मीडियावर दिल्लीतील पटेल नगरच्या दयाबस्तीजवळचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीतील पटेल नगरच्या दयाबस्तीजवळचा हा व्हिडीओ आहे. अगदी मेट्रो रुळाला लागूनच ही लोकवस्ती असल्याने अनेकांकडून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लोकवस्ती आणि धावत्या मेट्रोमध्ये फक्त एका हाताचं अंतर आहे. यामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असून कोणतीही दुर्घटना घडू शकते. तसेच वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही आपला जीव मुठीत घेऊन याठिकाणी रहावं लागत आहे. त्यामुळे एकीकडे प्रगती आणि दुसरीकडे मात्र या गोष्टींची खबरदारी न घेता असा प्रकार समोर येणं चुकीचं आहे. अशावेळी पावसाळ्यात किंवा अन्य दिवसांमध्येही या लोकांनी कंस राहायचं हा प्रश्न निर्माण होतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: न्यूयॉर्कमध्ये भारतीय तरुणानं आई-वडिलांना दिलं भन्नाट सरप्राईज; स्वतःला स्क्रीनवर पाहून भारावले आई-वडिल

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले असून याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. एकीकडे विकास होतोय म्हणून आनंद व्यक्त करताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन जगायला लागत आहे.