Delhi metro viral video: दिल्ली मेट्रो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दररोज लाखो लोक मेट्रोमध्ये प्रवास करतात. त्यामुळे मेट्रोमध्ये निरनिराळ्या प्रकारची, वेगवेगळ्या स्वभावाची लोक भेटतात. प्रवाशांची ‘लाईफलाईन’ असलेल्या मेट्रोला ‘डेडलाईन’ बनवण्यासाठी काही जण कारणीभूत ठरत आहेत. मेट्रोच्या दरवाज्यात उभे राहून स्टण्ट करणारे तरुण हे त्यामागचं सर्वात मोठं कारण ठरत आहेत. हे तरुण स्टंट करुन स्वतःचे आणि त्यांच्या सहप्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी हे तरुण काही करायला तयार असतात. आज पुन्हा एकदा मेटरोमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र पुढच्याच क्षणी या तरुणाला याची शिक्षा मिळाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला माहिती मेट्रो स्टेशनवर आल्यानंतर काही सेंकदात तिचे दरवाजे हे बंद होतात. मात्र हा तरुण या मेट्रोमध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती उडी मारून मेट्रोच्या आत प्रवेश करताना दिसत आहे, जेव्हा मेट्रोचे दरवाजे बंद होणार होते. यादरम्यान त्या व्यक्तीने वेगाने धावत उडी मारली, त्यामुळे तो वेळेवर मेट्रोच्या आत पोहोचला खरा, मात्र पण उडी मारताना उंची जास्त असल्याने तो मेट्रोमध्ये प्रवेश करताच एका बॉक्सवर आदळला. यादरम्यान मागील काही दिवसात दिल्ली मेट्रोमध्ये काही लोक रोमान्स करताना दिसले, काही अश्लिल कृत्ये करताना दिसले तर काही आपल्या विचित्र ड्रेसींग सेन्समुळे चर्चेत आले. दरम्यान आता या तरुणाचा स्टंट व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: उन्हाळ्यात देसी जुगाड; कामगारानं ड्रिल मशीनपासून बनवला पंखा

सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ @NoContextHumans नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३.२ मिलियन पेक्षा जास्त म्हणजे ३२ लाख वेळा पाहिले गेले आहे आणि ४८ हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi metro viral video man tries to enter metro by jumping stunt srk
Show comments