Shocking video: प्रवाशांनो, कृपया इकडे लक्ष द्या…. फलाट आणि पायदान यातल्या अंतरावर लक्ष ठेवा… अशा सूचना मुंबईकरांना तोंडपाठ आहेत… पण मुंबईत नवख्या असलेल्या लोकल प्रवाशांना धावपळीत हा अंदाज येत नाही… त्यात लेडीज डब्यात चढल्यानं माणूस आणखीच गांगरून जातो…मात्र त्याचे किती गंभीर परिणाम होतात. चुकून एखादा पुरुष महिलांच्या डब्यात चढला हे समजू शकतो पण जर १०, १२ पुरुष एकत्र महिलांच्या डब्यात शिरले तर? सध्या दिल्ली मेट्रोत एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. दिल्ली मेट्रोतील लेडीज डब्ब्यात चक्क पुरुष प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुरुषांची संख्या एवढी होती आतमध्ये असलेल्या महिलाही चेंगरल्या. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही पुरुष प्रवाशांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या पुरुष प्रवाशांना चांगलाच धडा शिकवला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिल्ली मेट्रोतील या व्हिडिओत दिल्ली मेट्रोच्या लेडीज डब्ब्यात पुरुष प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. एका मेट्रो स्टेशनवर ट्रेन थांबते. तेव्हा मेट्रोतील लेडीज डब्ब्यातून एक, दोन नव्हे तर अनेक पुरुष बाहेर येताना दिसत आहे.एखादा प्रवासी चुकून लेडीज डब्ब्यात जातो परंतु अनेक लोक एकाचवेळी लेडीज डब्ब्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे लेडीज डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. दिल्ली मेट्रोतील या व्हिडिओत लेडीज डब्ब्याबाहेर पोलिस उभे राहिलेले दिसत आहेत. त्यानंतर मेट्रोचा दरवाजा उघडतो तेव्हा आतमधून अनेक पुरुष प्रवासी बाहेर येताना दिसत आहे. पुरुष प्रवासी बाहेर येत असतानाच प्रवाशांनी त्यांना चांगलाच चोप दिला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “ऐ तुझी नोकरी खाऊन टाकेन” कंडक्टरबरोबर भांडताना महिलेनं ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?

एवढी हिम्मत येतेच कुठून?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @gharkekalesh या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, इतर डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांनाही अशीच वागणूक मिळेल का? तर आणखी एकानं एवढी हिम्मत येतेच कुठून? अशी कमेंट केली आहे.