Delhi Metro Viral Video Vulgar Dance: भारताची राजधानी दिल्ली येथे घडलेल्या अनेक धक्कादायक घटना लोकांच्या मनात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीची मेट्रोदेखील अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया युजर्ससाठी दिल्ली मेट्रोतील व्हायरल झालेले व्हिडीओ पाहणं ही गोष्ट आता काय नवीन राहिलेली नाही. प्रवाशांच्या सुखसोईंसाठी असणारी ही मेट्रो आता काही जणांसाठी अगदी मनोरंजनाचा भाग झाली आहे.

दिल्ली मेट्रोत (Delhi Metro Viral Video) दर दोन दिवसांनी काही ना काही घडतच असतं. सोशल मीडियावर अनेकदा दिल्ली मेट्रोतील भांडण, रोमान्स, थिल्लर डान्स अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन पोहोचतात. रील्स, डान्स, गाणी या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पाहणं ठीक आहे; पण जर आपल्यासमोर डान्सच्या नावावर काही अश्लील प्रकार घडत असेल, तर ते पाहणं अगदी किळसवाणं वाटतं. असाच प्रकार आता पुन्हा एकदा घडला आहे. दिल्ली मेट्रोत एक तरुणी अश्लील डान्स करताना दिसली आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक

हेही वाचा… साचलेल्या पाण्यात कपडे अन् शूज न भिजण्यासाठी तरुणीचा भन्नाट ‘जुगाड’; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, कमाल!

व्हायरल व्हिडीओ (Delhi Metro Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर असणाऱ्या या तरुणीने दिल्ली मेट्रोत ‘पतली कमर मेरी हात लगाता है क्यूं’ या गाण्यावर अश्लील डान्स केला आहे. क्रॉप टॉप, काळ्या रंगाची पॅन्ट, कलरफुल केस, असा पेहराव केलेल्या या तरुणीने अश्लील डान्स स्टेप्स करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या मेट्रोत असणाऱ्या काही जणांनी तिच्याकडे पाहिलं; तर काहींना या गोष्टींची सवय झाल्याने त्यांनी तिच्याकडे बघणंदेखील टाळलं.

‘delhi.connection’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसंच manishadancer01 असं या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं नाव आहे; ज्यावरून ती दररोज अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ शेअर करीत असते.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Delhi Metro Viral Video Users Reaction )

दिल्ली मेट्रोतील हा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे; तर काहींनी तिला ट्रोलदेखील केलं आहे. एकानं कमेंट करीत लिहिलं, “हा वेडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय.” एक जण म्हणाला, “एकदम बकवास.”

हेही वाचा… ऐकावं ते नवलच! डॉक्टरांनी ६० वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून काढला १६ इंचाचा दुधी भोपळा; शस्त्रक्रियेसाठी लागले तब्बल २ तास

“अशा लोकांना मेट्रोमध्ये कोण चढू देतं”, असा प्रश्नदेखील एका संतापलेल्या युजरनं कमेंट करीत विचारला आहे. “अशा लोकांकडून ५,००० रुपये दंड आकारला पाहिजे”, असंही एक जण म्हणाला.

Story img Loader