पालकांसाठी, त्यांची मुलंच सर्वस्व असतात.आपल्या मुलांच्या पाणी पालक हे नेहमी खंबीरपणे उभे असतात. मात्र कधी चिमुकल्या मुलांना त्यांच्या पालकांचा आधार झालेलं पाहिलयं का..नाही ना मग हा व्हिडीओ पाहा. दिल्ली मेट्रोमध्ये रोमान्स आणि डान्सचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. पण सध्या दिल्ली मेट्रोचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक खूप भावूक होत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन निरागस मुले त्यांच्या अंध पालकांसोबत प्रवास करताना दिसत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. लोक ते मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.
सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. मेट्रोमध्ये बसलेल्या पालकांना दिसत नाही. त्याच वेळी, त्यांच्यासोबत तीन मुले देखील आहेत, त्यांना नीट दिसत आहे. लोक म्हणतात की इतक्या अडचणी असूनही हे कुटुंब एकत्र आहे, ही मोठी गोष्ट आहे. व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (@salty_shicha_official) नावाच्या युजरने शेअर करत या कुटुंबाची कहाणी सांगितली आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या तरुणीनं सांगितलं की, आज ऑफिसमधून घरी जात असताना तिला हे कुटुंब दिसले. पालक पाहू शकत नाहीत. पण त्यांची तीन मुलं बघू शकत होती आणि त्यांच्या पालकांना आधार देत होती. या व्हिडिओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “बाबा माझ्याशी प्रेमानं बोलत नाही, आईला मी आवडत नाही” एकट्या पडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘काही नसून आनंदी आहेत.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘या कुटुंबाला पाहून माझे मन भरून आले.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘खूपच इमोशनल व्हिडिओ आहे, देव सगळं पाहत असतो.’