Delhi Metro Viral Video: सर्वसामान्यांना नेहमीच्या प्रवासासाठी मेट्रोचा प्रवास सोयीस्कर वाटतो. रोज असंख्य लोक मेट्रोतून प्रवास करत असतात आणि अशावेळी घडत असलेल्या काही मजेशीर तसेच भयानक घटना अनेकांनी पाहिल्या असतील किंवा ऐकल्या तरी असतील. विशेषत: दिल्ली मेट्रोतील प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत तर बऱ्याच जणांना माहित असेल. दिल्ली मेट्रो हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. त्याला कारण मेट्रोमध्ये पहायला मिळणारं एंटरटेनमेंट. दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. अशातच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय.

आता व्हायरल होत असलेल्या या नवीन व्हिडिओमध्ये, एक महिला अचानक मेट्रो कोचमध्ये धावत असल्याचे दिसत आहे. जणू कोणी लपलेला शत्रू तिच्या मागे लागला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला असे दिसते की, महिला मेट्रोच्या सीटवर बसली आहे आणि कॅमेरा चालू आहे, तिने मोबाईल व्यवस्थित सेट केलेला आहे. सगळं काही असं दिसतंय की रील बनवल्यासारखं वाटतंय. पण कॅमेरा चालू होताच, ती महिला अचानक तिचा फोन सोडून देते आणि काहीही न बोलता, मेट्रो कोचमध्ये अचानक धावू लागते.

प्रवाशांना बसला धक्का

महिलेचे हे कृत्य इतके धक्कादायक होते की जवळ बसलेले प्रवासी आश्चर्यचकित झाले आणि ते पाहतच राहिले, त्यानंतर काही सेकंदांनी मेट्रोमध्ये हास्याची लाट उसळली. लोक म्हणतात की, दिल्ली मेट्रो आता फक्त प्रवासाचे साधन राहिलेले नाही तर ते एक हृदयस्पर्शी रिअॅलिटी शो बनले आहे. काही जण कोचमध्ये उभे राहून त्यांची “गायन प्रतिभा” दाखवतात, काही जण प्रेमात गुंतलेले राहतात आणि आता काहींनी धावणे देखील सुरू केले आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला मेट्रोमध्ये जागा मिळाली किंवा नाही मिळाली तरी चालेल पण तुम्हाला त्यातील समाधान नक्कीच मिळेल, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ khushivideos1m नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की. “मुलीच्या धाडसाला सलाम. इतक्या लोकांसमोरही तिला लाज वाटली नाही.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “तुम्हाला इतका आत्मविश्वास कुठून मिळतो?” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे.