Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोसंबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे फार मजेशीर, तर काही फारच विचित्र असतात. अनेकदा लोक जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने मेट्रोतील नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात महिला दिल्ली मेट्रोच्या एका डब्यात चक्क मोठमोठ्याने कीर्तन करताना दिसत आहे. यावेळी सीआयएसएफ जवान येतात आणि सगळ्यांना चांगलंच फटकारतात. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेट्रोमध्ये महिलांचे कीर्तन

मेट्रोमध्ये अचानक कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाल्याने उपस्थित प्रवासीदेखील चकित झाले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला अंगावर चुनरी घेऊन भरमेट्रोच्या गर्दीत कीर्तन गाण्यास सुरुवात करतात. काही महिला सीट्सवर, तर चक्क खाली फ्लोअरवर बसून आरामात कीर्तन गाताना दिसतायत. या महिला इतक्या मोठमोठ्याने कीर्तन गात होत्या की, आजूबाजूच्या प्रवाशांना त्यांचा त्रास होतोय याचेही भान त्यांना नव्हते.

प्रवासी कीर्तनात तल्लीन होत घेत होते आनंद

यावेळी काही प्रवासी कीर्तनात तल्लीन होत आनंद घेताना दिसले; तर काही लोक शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. पण, अशा प्रकारे धावत्या मेट्रोमध्ये रील बनवणे, कोणत्याही प्रकारची व्हिडीओग्राफी करणे किंवा अशा प्रकारे इतर प्रवाशांना त्रास होईल असे वागणे बेकायदा आहे. तसेच मेट्रोमध्ये जमिनीवर बसण्याबाबत कडक सूचना लिहिलेल्या आहेत. पण, असे असूनही या महिला बिनधास्तपणे मेट्रोत बसून मोठमोठ्याने कीर्तन करीत होत्या.

या घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्या महिलांना भजन-कीर्तनाचा हा कार्यक्रम थांबविण्यास सांगितले. सीआयएसएफ जवान समोर येताच काही क्षण महिला खूप घाबरतात. त्यानंतर कान धरून माफी मागतात आणि आपली चूक मान्य करतात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, त्या महिला, माफ करा सर, असे म्हणताना दिसतायत.

दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी सुरू असलेले अश्लील, विचित्र प्रकार रोखण्यासाठी डीएमआरसीने रील बनवणे, अन्न खाणे, जमिनीवर बसणे यांवर तेथे बंदी घातली गेली आहे. अशी बेकायदा कृती करणाऱ्यांना पकडले गेल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे या महिलादेखील दंडास पात्र आहेत, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.

दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ @billu_sanda_7011 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, घर आणि मंदिर सोडून त्यांना सर्वत्र भक्ती आठवते. दुसऱ्या एकाने लिहिले की, मेट्रोमध्ये भक्ती करण्याचा अर्थ काय आहे, तुम्ही एकटेच मोठे भक्त आहात का? शेवटी एकाने लिहिले की, या महिलांना पकडले पाहिजे आणि त्यांना मोठा दंड ठोठावला पाहिजे.