Delhi Metro viral video: दिल्ली असो वा मुंबई इथला प्रवास कायमच चर्चेत असतो. लोकांच्या सोईसाठी मेट्रोची सुविधा पुरवण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर ही मेट्रो कायमच वेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. प्रवास करताना प्रत्येकाला वाटतं की, आपल्याला थोडं बसायला मिळालं तर आराम मिळेल. आणि या सीटसाठी अनेकदा प्रयत्नही केले जातात. अशावेळी वाद हा ठरलेलाच आहे. दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आता देखील दिल्ली मेट्रोमधला एक जबरदस्त बाचाबाचीचा व्हिडिओ समोर आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओमध्ये महिला प्रवाशी एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत आहे. मेट्रो ट्रेन आणि सकाळची वेळ म्हटल्यावर त्यात मोठी गर्दी जमा होते. सर्वच व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या दिशेने धाव घेतात. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतो. यामध्ये प्रवाशांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र गर्दीच्यावेळी धक्का लागल्यावर अनेक प्रवाशी आक्रमक होतात आणि भांडण करण्यास सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोत सातत्याने अतरंगी घडना घडतात. अशात आता काही महिला प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. झालं असं की एक २० वर्षांची तरुणी मेट्रोमध्ये फोनवर बोलताना शिवीगाळ करत होती. ही गोष्ट एका महिलेला आवडली नाही. परिणामी तिनं शिव्यांवरून या तरुणीला सुनावलं. पण लक्षवेधी बाब म्हणजे तरुणीला ओरडत असताना महिलेनं तिच्या वजनावरुन तिला हिणवलं.

वजनावरून बोललेल अर्थातच कुणालाच आवडत नाही, मात्र इथे ज्या तरुणीला ती महिला बोलली ती तरुणी सोडून मध्येच एक महिला तरुणीची बाजू घेऊन भांडू लागली. तुम्हीही काही बोला पण एखाद्याच्या शरीरावरून तुम्ही बोलू शकत नाही असं तिसऱ्या महिलेचं म्हणण आहे. मात्र व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कुणीच कुणाचं ऐकत नाहीये. तिघीही अपशब्द वापरत भांडण करत आहेत. तरुणी महिलेला तुझं वय बघ असं म्हणतेय तर ती महिला तुझं वजन बघ असं म्हणतेय. हा सगळ्या ड्रामा बाकीचे प्रवासी मात्र ऐंजॉय करताना दिसत आहेत.

https://twitter.com/gharkekalesh/status/1894034291496980686

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे