Viral video: अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांनीही माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना चर्चेत आल्या. अशातच दिल्लीतून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या शेजाऱ्यांच्या पाळीव कुत्र्याला तिच्या दारासमोर सौच करण्यापासून रोखण्याची विनंती केली. मात्र, हे तिला चांगलंच महागात पडलं. कारण शेजाऱ्यांनी या महिलेच्या अंगावर कुत्रा सोडला. या कुत्र्यानं महिलेला चक्क ५ वेळा चावा घेतला. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in