मात न तू वैरणी म्हणवणारी संतापजनक घटना दिल्लीत घडलीय. केवळ शाळेत दिलेला गृहपाठ नाही केला म्हणून एका निर्दयी आईने तिच्या मुलीला इतकी भयंकर शिक्षा दिलीय की त्याची साधी कल्पना जरी केली तरी जीव अगदी कळवळतो. कडक उन्हामुळे तळपत असलेल्या छतावर मुलीला तिचे हात पाय बांधून झोपवलं आणि उन्हाचे गरम चटके तिच्या पाठीवर देण्याची ही राक्षसी शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. उन्हाच्या चटक्यांमुळे ही मुलगी कळवळत राहिली पण तिच्या निर्दयी आईच्या दगड मनाला काही पाझर फुटला नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हे वाचून सुरूवातीला तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. इतकी निर्दयी आई असू शकते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण हे प्रत्यक्षात घडलंय. खरं तर हा व्हिडीओ सुरूवातीला कुणीतरी पोलिसांसोबत शेअर केला होता. हा व्हिडीओला दिल्लीतल्या करावल नगरमधला असल्याचं सांगण्यात आलं. पण ज्यावेळी पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा अशी कोणतीच घटना त्या परिसरात घडली नसल्याचं समोर आलं. त्यानंतर हा तपास सुरूच ठेवला आणि हा व्हिडी खजूरी खास परिसरातल्या तुकमीरपूर गल्ली नंबर २ मधला असल्याचं आढळून आलं. त्यानंतर या प्रकरणात खोलवर चौकशी केल्यानंतर आईचा जबाब नोंदवण्यात आला. यात आईचं असं म्हणणं आहे की, शाळेतून दिलेला गृहपाठ केला नाही म्हणून तिने आपल्या मुलीला घराच्या छतावर उन्हाचे चटके देण्याची शिक्षा दिली होती. ही शिक्षण ५ ते ७ मिनीटे दिल्यानंतर तिला पुन्हा खाली घरात घेण्यात आलं होतं, असं देखील आईने सांगितलं.

आणखी वाचा : अरेरे! न जाणे काय दुर्बुद्धी सुचली; पिंजऱ्यातल्या Orangutan ची छेड काढली, मग चांगलीच अद्दल घडवली, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : ७० वर्षांनंतर भारतात पुन्हा दिसणार चित्ता, आफ्रिकातून आणण्याची सरकारची तयारी

ज्यावेळी या निर्दयी आईने आपल्या मुलीला ही भयंकर शिक्षा दिली तेव्हा शेजाऱ्यांनी छतावर जाऊन याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मुलगी ज्या पद्धतीने किंचाळतेय, त्यावरून उन्हाच्या गरम चटक्यांमुळे तिची पाठ किती पोळून निघाली असेल, याचा अंदाज बांधता येतो. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. आपल्या पोटच्या मुलीचा जोरजोरात आवाज ऐकूनही या निर्दयी आईला काहीच कसं वाटलं नाही, असा सवाल प्रत्येक जण करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आपल्या मुला बाळांसोबत असं कृत्य न करण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.

या प्रकरणी खजुरी खास पीएस येथे कलम 75 बाल न्याय कायदा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांकडून मुलांना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यापासून रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत.

Story img Loader