Shocking video: त्यांच्या निधनाची बातमी सगळ्या गावात पसरली… लोकांची गर्दी झाली… सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली आणि अचानक चमत्कार झाला. अंत्ययात्रा सुरू असतानाच पार्थिवात प्राण आले. घटना काहीशी फिल्मी वाटत असली तरी ती प्रत्यक्षात घडली आहे राजधानी दिल्लीत. राजधानी दिल्लीच्या नरेला परिसरात लोक या घटनेनं चांगलेच हैराण झाले. त्याचं झालं असं की एका वृद्धाच्या मृत्यूनंतर लोक अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वीच त्या वृद्धाने आपले डोळे उघडले!
वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळे उघडले
नरेलाच्या टिकरी खुर्द गावातील ६२ वर्षीय नागरिक सतीश भारद्वाज यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या परिवारातील लोकांनी केला होता. वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यापूर्वी वृद्धाच्या चेहऱ्यावरील कपडा बाजूला करण्यात आला, त्यावेळी लोक चांगलेच हैराण झाले. कारण, तो वृद्ध व्यक्ती जिवंत निघाला आणि श्वास घेऊ लागला. इतकंच नाही तर त्या व्यक्तीने डोळेही उघडले.
स्मशानभूमीतून थेट रुग्णालयात
स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांनी लगेच दिल्ली पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन करुन त्याबाबत माहिती दिली. इतक्यात तिथे स्माशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या एका डॉक्टरनं तपासणी केली असता तो व्यक्ती जिवंत असल्याची पुष्टी त्यांनी केली. तो व्यक्ती श्वास घेत आहे आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तिथे असलेल्या रुग्णवाहिकेतून त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. दरम्यान ही घटना २०२१ चा असून त्याचा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “मंदिर बनने लगा है, भगवा रंग चढने लगा है” तरुणांनी मेट्रोमध्ये गायलं राम मंदिर उभारणीचे गाणे
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओवर एका व्यक्तीने लिहिले की,’कोणीतरी त्यांना पुन्हा जिवंत केले आहे.’ दुसऱ्या युजरने गंमतीत लिहिले, ‘काका चार्जर विसरले होते.’