शहरात चोरट्यांचा सुळसुळाट फार वाढला आहे. चोरी- लुटमारीच्या कित्येक घटना आपल्या कानावर पडत असतात. पण सध्या एका विचित्र चोरीची घटना चर्चेत आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी कधी कोणाला पैसे दिल्याचे तुम्ही ऐकले आहे का? होय. तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल पण अशक्य वाटणारी ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

बंदुकीच्या धाकावर एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांनी त्यांना १०० रुपये दिले आणि त्यांना कोणतीही हानी न पोहचवता घटनास्थळावरून जाऊ दिले दिल्ली पोलिसांना रविवारी दोन चोरांना अटक केली. शाहदरा जिल्ह्यात पोलिसांना लुटमारीची एक विचित्र घटना सीसीटीव्हिमध्ये दिसली. ज्याचे सीसीटिव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. या सीसीटिव्हीच्या मदतीने चोरट्यांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोरट्यांचा अजब व्हिडिओ व्हायरल!

दिल्ली पोलिसांनी २१ जूनला सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामध्ये चोरटे बदूंकीचा धाक दाखवून लुटमार करताना दिसत आहेत. फुटेजमध्ये हेल्मेट घातलेले दोन पुरुष जोडप्याजवळ त्यांची दुचाकी थांबवताना दिसत आहेत. एक माणूस स्कूटरवरून उतरतो आणि जोडप्याकडे बंदूक दाखवतो, तर दुसरा त्यांना झटकताना दिसतो. पण जेव्हा त्यांना समजते की, एका जोडप्याकडे फक्त २० रुपयांशिवाय काहीच नाही तेव्हा चोरटे त्यांना १०० रुपये देतात आणि निघून जातात. हे सर्व दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

हेही वाचा – हे काय चाललयं? दिल्ली मेट्रोत पुन्हा सर्वांसमोर KISS करताना दिसलं कपल! Video व्हायरल

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या जोडप्याने नंतर पोलिसांना सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी त्यांना १०० रुपयांची नोट दिली. परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना चोरटयांचा माग काढण्यात यश आले. घटनेच्या वेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.

हेही वाचा – चालत्या बसमध्ये डुलकी घेणं पडलं महागात, तोल गेला अन् दरवाज्यातून थेट….Video पाहून अंगावर येईल काटा!

पोलिसांनी जप्त केला बंदूक, स्कुटर अन् ३० फोन

डीसीपी रोहित मीना यांनी सांगितले की, ”चोरटे खूप नशेत होते. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यांनंतर इतक अनेक परिसरात त्यांनी दहशत निर्माण केल्याचे दिसून आले.आम्ही गुन्ह्याच्यावेळी वापरलेली बंदूक, स्कूटर आणि ३० मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यांच्या विरोधात चार प्रकरणांची नोंद झाली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police arrest two robbers for looting couple on gunpoint when found they had only rs 20 robbers gave them rs 100 snk
Show comments