चोरांसाठी चेन स्नॅचिंग हा पैसे मिळवण्याचा एक सहज मार्ग आहे. आतापर्यंत सोनसाखळी चोरांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. चोरटे महिलांना ईजा पोहचवून त्यांच्या गळ्यातील चैन खेचून निघून जातात. तर पोलिसांना अशा चोरांवर चोवीस तास लक्ष ठेवावं लागतं. दिल्लीच्या मॉडेल टाऊन बाजारातसुद्धा अशीच एक घटना घडली आहे. बाजारात महिलेची चेन घेऊन दोन चोर दुचाकीवरून पळ काढत होते. पण, वेळीच हजर राहणारे दिल्लीचे अधिकारी एएसआई अजय यांनी फिल्मी स्टाईलमध्ये चोरांना पकडलं आहे.

बाजारात दुचाकीवरून जाणारे दोन चोर एका महिलेसोबत चेन स्नॅचिंग करत होते. बाजारात कामानिमित्त दिल्ली पोलिसांचे एएसआईदेखील उपस्थित होते. चेन स्नॅचिंगची घटना पाहताच त्यांनी चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली आणि गुन्हेगारांच्या दुचाकीला लाथ मारून रोखले. पोलिस कर्मचारी आणि इतर लोकांनी मिळून चोरट्यांना पकडले आणि त्यामुळे चोरट्यांचा चेन स्नॅचिंगचा प्लॅन पूर्णपणे फसला. हे पूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. योग्य वेळी चोरांना पकडणाऱ्या एएसआई अजय यांचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक

हेही वाचा… गुगलची पंचविशी! जगप्रसिद्ध सर्च इंजिनचा २५ वा वाढदिवस

व्हिडीओ नक्की बघा :

एएसआईने (ASI) शिकवला चोरांना धडा :

२४ सप्टेंबरला अधिकारी संध्याकाळी ५:१० मिनिटांच्या सुमारास एएसआई (Assistant Sub-Inspector) अजय झा मॉडेल टाऊन मार्केटमध्ये गेले होते. यादरम्यान परिसरातून त्यांना रस्त्यावर ‘चोर-चोर’ असा आवाज ऐकू आला. दोन सोनसाखळी चोर दुचाकीवरून पळ काढून जात होते. एएसआई अजय हे पाहून धावत रत्यावर गेले आणि दुचाकीवरून जाणाऱ्या चोरांच्या गाडीला लाथ मारली. असे करताच दोन्ही चोर दुचाकीवरून जमिनीवर खाली पडले आणि परिसरात जमलेल्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले.

दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स (ट्विटर) @DelhiPolice अकाउंटवरून शेअर केला आहे. दिल्ली पोलिस कम्युनिकेशनमध्ये तैनात ASI अजय झा यांनी हिम्मत दाखवून मॉडेल टाऊन मार्केटमध्ये स्कूटरवरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना लाथ मारून रोखले आणि चेन स्नॅचिंगचा प्रयत्न उधळून लावला. #दिल्ली पोलिस यांना तुमचा अभिमान आहे, असे खास कॅप्शन या व्हिडीओला देऊन कौतुक करण्यात आले आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं मन जिंकत आहे.

Story img Loader