सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. कोणतीही गोष्ट एकावेळी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. आपण कितीही व्यस्त असलो तरी दिवसभरातील काही वेळ सोशल मीडियावर नक्की घालवतो. त्यामुळेच मनोरंजनासोबतच समाजाला जागृक करणाऱ्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात. अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
दिल्ली पोलिसांनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘अनुपमा’मधील एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपमा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली एक डायलॉग बोलताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ का पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओमधून नेमकं काय सांगायचं आहे? जाणून घेऊया.
आणखी वाचा – कापलेल्या झाडाने उगवला सूड; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा भन्नाट व्हिडीओ पाहाच
दिल्ली पोलिसांचे ट्वीट
दिल्ली पोलिसांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये अनुपमा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली एक डायलॉग बोलत आहे. “मी कधीही बाहेर जाईन, कोणासोबतही जाईन आणि काहीही करेन, तुम्हाला याने काय फरक पडतो?” अशा प्रश्न अनुपमा या व्हिडीओमध्ये विचारत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलिसांनी हटके कॅप्शन जोडले आहे. त्यांनी व्हिडीओच्या शेवटी लिहले आहे, “कही भी जाओ बेहेन बस मास्क पेहेन कर जाओ.” म्हणजेच तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा फक्त जाताना मास्क घालून जा असा संदेश दिल्ली पोलिसांना या ट्वीटमधून द्यायचा आहे.
VIRAL VIDEO : स्वत:च्या शिक्षणासाठी ही मुलगी विकतेय पाणीपुरी; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
अजुनही आपल्यातून करोना पूर्णपणे गेलेला नाही. करोनाची रुग्णसंख्या दिवससेंदिवस वाढत आहे. दिल्लीमध्ये देखील करोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी करोना नियमांचे पालन करा असे आवाहन करणारे हे ट्वीट केले आहे. सर्वांनी करोना नियमांचे पालन करत बाहेर जाताना नेहमी मास्क वापरावा असे आवाहन दिल्ली पोलिसांकडून करण्यात आले आहे.