दरवर्षी अनेकजणांचा रस्त्यावरील अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो. बऱ्याचवेळा या व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवते. अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना फोन वापरल्याने कसे अपघात घडतात, हे दाखवण्यात आले आहे. रस्त्यावर चालणारे जेव्हा मोबाईमध्ये बघत चालतात त्यावेळी त्यांचे गाड्यांकडे किंवा रस्त्यावरील इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना कशाप्रकारे दुखापत होऊ शकते, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच गाडी चालवताना एका महिलेचे लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे तिचा कसा अपघात होतो हे देखील दाखवण्यात आले आहे. पाहा दिल्ली पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडीओ.
आणखी वाचा : नारळातून खोबरं काढण्याची भन्नाट कल्पना; IAS Officer सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच
दिल्ली पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ :
या व्हिडीओमधून दिल्ली पोलिसांनी नागरिकांना रस्त्यावर फोन वापरल्याने होणाऱ्या अपघातांबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओबरोबर ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ खतरनाक हो सकता है। वाहन चलाते समय ध्यान सिर्फ सड़क पर रखें, मोबाइल पर नहीं।’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.