क्रिकेट विश्वचषक २०२३ (Cricket World Cup 2023 Final Match india Vs Austraila)च्या अंतिम सामन्याला आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना रंगतोय. देशभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्यावर लक्ष ठेवून आहेत. टीम इंडियाने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील सर्व १० सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करुन सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यातही भारताला यश मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे, या सामन्यात आता दिल्ली पोलिसांची एक खास एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलिसांनी भारतीय संघाला दिल्या खास पद्धतीने शुभेच्छा

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
anand ahuja viral video
सोनम कपूरच्या पतीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “पैसा असूनही…”

दिल्ली पोलिसांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ट्रॅफिक सिग्नल लाइटचा व्हिडीओ पोस्ट करत अनोख्या अंदाजात भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “भारत, तुम्हाला आधीच माहित आहे काय करायचे आहे!” . या व्हिडीओत पिवळ्या रंगाची सिग्नल लाइट दिसत आहे, ज्यावर ‘पुढे जाण्यासाठी तयार राहा, असे लिहिले आहे, यानंतर पुढे Go India Go’ लिहिले आहे.

ज्याप्रमाणे ड्रायव्हर्स पिवळ्या रंगाची सिग्नल लाइट येताच गाडी पुढे नेण्यासाठी तयार असतात, त्याचप्रमाणे भारतीय संघाने सतर्क राहून विजयाच्या दिशेने झेप घ्यावी असा मेसेज दिल्ली पोलिसांनी या पोस्टमधून दिला आहे.