Viral video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. तसेच मुलांना त्यांच्या खास शैलीत शिकवून त्यांना भुरळ घालणारे अनेक शिक्षक तुम्ही पाहिले असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षिका आगळ्या वेगळ्या शैलीत मुलांना शिकवताना दिसत आहे.

अनेकदा शाळेत विद्यार्थ्यांची उंची मोजली जाते. तुम्हाला माहितीये का उंची कशी मोजतात? आता तुम्ही म्हणाल हो त्यात काय विशेष.. पण दिल्लीतील एक शिक्षिका ज्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये त्यांनी मुलांना वेगळ्या पद्धतीत स्वत:ची उंची स्वत: कशी मोजायची हे सांगितलं आहे. ही पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तसेच ही पद्धत जाणून घेतल्यावर तुम्हीही म्हणाल की आम्हाला हे माहित नव्हते.

Man Trying to Kiss King Cobra | king cobra shocking video
बापरे! भल्यामोठ्या फणाधारी किंग कोब्राचे तरुणाने घेतले चुंबन, तितक्यात घडले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
BJP MLA Parag Shah is Maharashtra's Wealthiest Candidate from Ghatkopar East Constituency
‘५०० कोटींवरून पाच वर्षात थेट ३३०० कोटी’, सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीचा तपशील वाचून डोळे गरगरतील
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

स्वत:ची उंची स्वत: अचूकपणे कशी मोजायची?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिल्लीतील एका सरकारी शाळेतील शिक्षक वर्गातील मुलांना त्यांची उंची मोजण्यासाठी शॉर्टकट पद्धत सांगत आहेत. शिक्षिका ज्या पद्धतीने मुलांना लांबी आणि उंची मोजण्याचे प्रमाण समजावून सांगत आहेत ते खूप मनोरंजक आहे. शिक्षिका मुलांना सांगत आहेत की तुम्ही तुमच्या दोन्ही हातांनी तुमची उंची कशी मोजू शकता. शिक्षिका मुलांना एक एक करून पुढे बोलावतात आणि नंतर एक हात जमिनीवर आणि एक हात काळ्या फळ्यावर ठेवण्यास सांगतात. एक हात जमिनीवर आणि एक हात काळ्या फळीवर ठेवल्यानंतर, शिक्षिका काळ्या फळ्यावर हाताच्या मापावर खडूने खून करतात, त्यानंतर जमिनीवर हात आणि काळ्या फळीमधील अंतर म्हणजे मुलांची एकूण उंची. अशाप्रकारे तुम्हीही स्वत:ची उंची स्वत: अचूकपणे मोजू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा>> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं

सपना असे या शिक्षिकेचे नाव असून ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशाप्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ पोस्ट करत असते. मुलांनाही हा प्रकार आवडतो आणि त्याचा खूप आनंद होतो. अशाप्रकारे उंची मोजायची असते हे तुम्हाला माहिती होतं का हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा

Story img Loader