दिल्लीकरांना त्यांच्या घरात एक सुंदर मोर पाहायला मिळाला. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब’ हे गाणे ऐकू येत आहे. ‘सफरनाम्यानिधी’ या ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “दिल्लीसारख्या शहरात मोर पाहणे हे किती दुर्मिळ दृश्य आहे. मी हे दृश्य एक दशकानंतर पाहत आहे. हे खूप सुंदर आहे.” असं लिहीत हा व्हिडीओ शेअर केलाय. दिल्लीतल्या विकासपुरी परिसरात हा मनमोहक मोर दिसला.
या व्हिडीओमध्ये एक चित्तथरारक सुंदर मोर बाल्कनीच्या रेलिंगवर उभा असलेला दिसत आहे. हा मोर दुसर्या व्यक्तीच्या बाल्कनीत उडून जाताना दिसत आहे. दिल्लीच्या आसपास मोर दिसणे दुर्मिळ असले तरी त्यांना उडताना पाहणे अधिक दुर्मिळ आहे. नेटिझन्सने हार्ट-टू-आय इमोजीसह कमेंट्सचा पूर आणला आहे आणि दृश्याला ‘अविश्वसनीय’ म्हटलंय.
ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. मे महिन्याच्या शेवटी इथे मोर येतात. काल या ट्रॅव्हल ब्लॉगरच्या घराजवळ मोर आला होता. यावेळी त्याने हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. रेकॉर्डिंगमध्ये एक मोर एका घराच्या बाल्कनीतून दुसऱ्या घराकडे उडताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत आणि अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ४.८ मिलियन लोकांनी पाहिला आहे आणि ६ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
आणखी वाचा : बापरे! चालकाशिवायच धावू लागली रिक्षा; VIRAL VIDEO पाहून लोक आश्चर्यचकित
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : भाऊ असावा तर असा! बहिणीला अडचणीत पाहून लढवली अशी काही शक्कल…, पाहा VIRAL VIDEO
भारतात नैऋत्य मान्सून सुरू झाल्यावर मोरांचा प्रजनन काळ सुरू होतो. त्यामुळे सध्या मोरांचा प्रजनन हंगाम सुरू आहे. या काळात मोरांनी पंख पसरून इतर मोरांना आकर्षित करण्यासाठी नाचणे ही सामान्य गोष्ट आहे.