Viral video: लग्नाचा सीझन चालू आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या मित्राच्या लग्नात जायचे असेल. बहुतेक मुलींना लग्नात लेहेंगा घालायला आवडते. अशातच विवाहसोहळ्यांमध्ये नववधू सर्वांत जास्त टेन्शनमध्ये असते. मेहंदीचा कार्यक्रम, लग्नसोहळ्यापासून ते रिसेप्शनसाठी कोणत्या प्रकारचा पोषाख निवडावा? लग्नाची तारीख ठरल्यापासून याच चिंतेत ती अधिक असते.पण स्वतःच्याच लग्नामध्ये हटके वेशभूषा कशी परिधान करावी? यासाठी स्वतःलाच विचार करावा लागतो. तुम्ही सुद्धा लाल, पिवळ्या रंगाचे त्याच- त्याच डिझाइनचे कपडे घालण्याऐवजी गुलाबी रंगाच्या लेहंगा घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ पाहा.

आता तुम्ही म्हणाल की, एवढे महाग लेहंगे परवडायलाही हवे. पण आता बजेटचं तुम्ही काहीही टेन्शन घेऊन नका, कारण १० हजारांचे हे नवरीचे लेहंगे तुम्हाला केवळ ३०० रुपयांमध्ये मिळू शकतात. हो तुम्ही बरोबर वाचताय, दिल्लीतील सदर बाजार पटरी मार्केट संडे बाजारात एकापेक्षा एक भारी लेहंगे केवळ ३०० रुपयांपासून मिळत असल्याचा दावा केला जात आहे. हे लेहंगे त्यावरच वर्क आणि डिझाईन पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही की एवढ्या स्वस्तात एवढे भारी लेहंगे खरच मिळतात का.

फॅशन ट्रेंडमध्ये अनेक बदल झाले असून आजकाल तुम्हाला लेहेंग्यांमध्येही कंटेम्प्रेरी डिझाइन्स पाहायला मिळतील. या प्रकारच्या लेहेंग्यातही तुम्हाला थोडा इंडो-वेस्टर्न टच दिसेल. या व्हिडीओमध्ये पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेहंगे दिसत आहेत, तसेच वेगवेगळे रंग डिझाइन्सचेही लेहंगे दिसत आहेत. तसेही सध्या लग्नामध्ये लाल रंगाचा पोषाख परिधान करण्याचा ट्रेंड कमी कमी होत आहे. आता नववधु कॉन्ट्रास्ट शेडमधील कपड्यांना पसंती दर्शवत आहेत. लग्नाचे लेहंगे मार्केटमध्ये, दुकानांमध्ये १० ते १५ हजरांमध्ये मिळातात हे देखील तुम्ही ऐकलं असेल. पण हेच लेहंगे या दिल्लीच्या बाजारात केवळ ३०० रुपयांना मिळताहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” मित्राच्या लग्नात तरुणानं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ ridewithus002 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्लॉगरनं सदरबाजार पटरी मार्केटमधील विविध प्रकारचे लेहंगे दाखवले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला वर्ग या व्हिडीओवर तुटून पडल्या आहेत. प्रत्येक जण एकच विचारत आहे ते म्हणजे दिल्लीत नक्की कुठे, किती वाजता वेळ. दरम्यान काहींनी हे खोटं असल्याचंही म्हंटलंय. तुम्हाला काय वाटतं हे खरंच असेल की फसवणूक असेल?