Delhi water crisis Viral video: वाढत्या उन्हाच्या चटक्यांसोबत टंचाईची झळही देशभरात पाहायला मिळतेय.देशाच्या बहुतांश भागांत पाणी टंचाई तीव्र झाली आहे.राजधानी दिल्लीत उष्णता सातत्याने विक्रम मोडत आहे. पारा ५० अंशांच्या पुढे पोहोचला आहे, त्यामुळे दिल्लीतही पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. राजधानीतील अनेक भागात पाणीटंचाई असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे दिल्ली सरकारनेही पाण्याचा अपव्यय केल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टँकर पाहताच लोक पाण्यासाठी कसे तुटून पडले आहेत आणि धावत आहेत हे दिसत आहे.
लोक टँकरवर चढले
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ दिल्लीचा असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये पाण्याचा टँकर थांबण्याआधीच लोक त्याच्या मागे धावू लागतात. यानंतर काही लोक चालत्या टँकरवर चढून त्यात पाईप टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जीव धोक्यात घालून लोक पाणी भरायला तयार आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला, लहान मुले आणि पुरुष सर्वजण आपली भांडी घेऊन रस्त्यावर उभे आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ
दिल्लीतील पाण्यावरून झालेल्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने शेअर होत आहे. या कडाक्याच्या उन्हात पाण्याची अशी स्थिती असेल तर या लोकांनी जायचे कुठे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. काही लोक यासाठी दिल्ली सरकारला दोष देत आहेत. मात्र, असे चित्र दरवर्षी दिल्लीतील अनेक भागात पाहायला मिळते, जिथे लोक पाण्यासाठी टँकरची वाट पाहत असतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Photo: आयुष्यात फक्त एवढा कॉन्फिडन्स पाहिजे; मित्र दहावीला पास झाल्यानंतर लावला बॅनर; पाहून पोट धरुन हसाल
दिल्ली सरकारने कडकपणा दाखवला
पाण्याची मागणी वाढल्यानंतर दिल्ली सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत. विनाकारण पाण्याचा अपव्यय करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे. यामध्ये अशा लोकांचाही समावेश आहे जे बाइक किंवा कार धुण्यासाठी घरगुती पाण्याचा वापर करतात. यासाठी दिल्ली सरकारने सुमारे २०० पथके तयार केली आहेत, जी दिल्लीतील विविध भागात छापे टाकत आहेत.