“माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही प्रार्थना आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल पण या कवितेचा अर्थ किती लोकांनी समजून घेतला आणि अर्थ घेऊन किती लोकांनी आपल्या आयुष्यात बदल केला. माणुसकी हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. प्रत्येकाबरोबर माणुसकीने वागले पाहिजे आणि नेहमी मनामध्ये दया भाव असला पाहिजे. ही माणुसकी जपणारे फार मोजके लोक असतात त्यांच्यामुळेच जगात आजही माणुसकी शिल्लक आहे. खऱ्या माणुसकीचे दर्शवणाऱ्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलिकडेच एका तरुणीच्या दयाळू कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले. इंस्टाग्रामवर मेकअप व्हिडिओंसाठी लोकप्रिय असलेल्या दिल्लीतील होनी पि पल Honeey Pipal)नावाच्या महिला एका कॅबने प्रवास करत होती दरम्यान अचानक कॅब चालकाची तब्येत बिघडली. त्यानंतर तरुणीने जे काही केले ते खरचं कौतुकास्पद आहे.

कॅब चालकाची तब्येत बिघडल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या ज्यामुळे तो कॅब चालवू शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तरुणीने त्याला मागच्या सीटवर आराम करण्यास सांगितले. तिने स्वत: कार चालवण्याची जबाबदारी स्विकारली . ही सर्व घटना तिने कॅमेऱ्यात कैद केली आहे.

व्हिडिओमध्ये पाहून शकता की, ड्रायव्हर आजारी पडल्यानंतर ती उबर कॅब चालवत असल्याचे दिसत आहे. ती ड्रायव्हरच्या सीटवर बसली, सीटबेल्ट बांधला आणि कार चालवत आहे. तसेच नियुक्त केलेल्या ड्रायव्हरची तब्येत बिघडल्यानंतर ती गुरुग्राम ते दिल्लीसाठी बुक केलेल्या कॅब चालकाची ड्रायव्हर बनली आहे.

व्हिडिओ पहा

कुटुंबासह प्रवास करताना

व्हिडिओमध्ये, ती तिचे कुटुंब प्रवास करत असताना कॅब चालवताना दिसत होती. ती तिच्या आजी, आई आणि लहान मुलीबरोबर प्रवास करत होती. वृद्ध महिला ड्रायव्हरच्या सीटजवळ बसली होती तर तरुणची आई आणि मुलगी उबर कॅबीबरोबर मागच्या सीटवर बसली होती.

जेव्हा प्रवासात अनपेक्षित वळण आले आणि तिला घरी परतण्यासाठी स्वतः कॅब चालवावी लागली. म्हणूनच तिने लोकांना कार चालवायला शिकण्यास सांगितले, विशेषतः अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी.

घाबरून जाण्याऐवजी किंवा उबर सेवांकडे समस्या वाढवण्याऐवजी, जेव्हा ड्रायव्हरला उलट्या झाल्या आणि अचानक आजारी पडला, तेव्हा तिने ताबडतोब जबाबदारी घेतली आणि स्वत: गाडी चालवून इच्छित ठिकाणी पोहचली. एवढेच नाही तर कॅबचालकाला मागच्या सीटवर आराम करण्यास सांगितले.

आजारी ड्रायव्हरशी संभाषण

ड्रायव्हरची प्रकृती तपासण्यासाठी, तिने त्याच्याशी संभाषण केले आणि विचारले, “मी कार कशी चालवत आहे?” ज्यावर त्याने धीर देत उत्तर दिले, उत्कृष्ट.”

“बघ, भाऊ, तू आजारी आहेस. आणि, मी गाडी चालवत आहे. तर, भाडे काहीही असो, आपण ते ५०-५० वाटून घेऊ. कारण अर्धा हिस्सा तर माझा देखील आहे.” तिने विनोद केला.

हा व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे आणि तिचे कौतुक झाले आहे. तिने ही घटना १८ मार्च रोजी घडल्याचे उघड केले.