सायकलवर फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोच्या एजंटला अचानक मोठी भेट मिळाली आहे. एका ट्विटर युजरने राजस्थानच्या कडक उन्हात डिलिव्हरी करणाऱ्या एजंटबद्दल पोस्ट केली होती. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि अनेक ट्विटर युजर्सनी त्यासाठी निधी गोळा केला. या पैशातून त्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला एक मोटारसायकल भेट म्हणून देण्यात आली आहे.

आदित्य शर्मा या ट्विटर यूजरने रविवारी एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये एक झोमॅटो एजंट राजस्थानच्या कडक उन्हात वेळेवर डिलिव्हरी करण्यासाठी सायकलचा वापर करत असल्याचे म्हटले होते. त्याने लिहले, “आज मला माझी ऑर्डर वेळेवर मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरी सायकलवरून केली ते ही शहराचे तापमान ४२ अंश सेल्सिअस असताना.”

Viral Video : वेगात आलेली BMW आदळली रस्ता क्राॅस करणाऱ्या महिलेला; पुढे जे झाले ते पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

झोमॅटो डिलिव्हरी पार्टनरशी बोलताना शर्माला कळले की त्यांचे नाव दुर्गा मीना आहे आणि ते ३१ वर्षांचा आहे. ते ४ महिन्यांपासून फूड डिलिव्हरी करत असून एका महिन्यात सुमारे १० हजार रुपये कमावतात. महामारीच्या काळात त्यांनी त्यांची शिक्षकाची नोकरी गमावली. त्यामुळे त्यांना हे काम करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. युजरने लिहले, “दुर्गा मीना एक शिक्षिक आहेत आणि ते गेल्या १२ वर्षांपासून शिकवत होते. कोविड दरम्यान त्यांची शाळेची नोकरी गेली. ते माझ्याशी इंग्रजीत बोलत होते.”

‘कच्चा बादाम’ नंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘बाकी नींबू बाद विच पाऊंगा’; लिंबूपाणी विकण्याची ही स्टाइल पाहून हैराण व्हाल

दुर्गा मीना यांनी बी.कॉम मध्ये बॅचलर केले आहे आणि त्यांना एम.कॉम करायचं आहे पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी झोमॅटोसोबत काम करायला सुरुवात केली. त्यांना इंटरनेटबद्दल सर्व काही माहित आहे. दुर्गाने आदित्यला सांगितले की त्यांना चांगल्या वायफायसह स्वतःचा लॅपटॉप हवा आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवू शकतील.

सायकल घेऊन उंच टेकडीवरून मुलीने मारली उडी; हा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

आदित्यने डिलिव्हरी एजंटसाठी मोटारसायकल खरेदी करण्याच्या उद्देशाने निधी उभारण्यास सुरुवात केली आणि फक्त चार तासात त्याने बाईकसाठी ७५ हजार रुपये जमवले. प्रतिसाद इतका प्रचंड होता की एका दिवसात पैसे जमा झाले. काही तासांपूर्वी आदित्यने या घटनेबाबत अपडेट शेअर केले आणि लिहिले की दुर्गा मीना यांनी नवीन बाइक विकत घेतली. आदित्य याने काही मिनिटांपूर्वी ट्विटरवर नवीन विकत घेतलेल्या बाईकसह मीनाचा फोटो शेअर केला होता.

Story img Loader