तंत्रज्ञानाने आपले आयुष्य सोपे केले आहे. अनेक साध्या साध्या गोष्टींसाठी आपण अनेक उपकरणांवर अवलंबून असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक मशीन्सच्या संपर्कात असतो. सतत जवळ बाळगणाऱ्या या उपकरणांमुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? मुंबईमध्ये घडलेल्या एका प्रसंगामुळे तुम्ही देखील या विचारात नक्की पडाल.
मुंबईमधील प्रभादेवी येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ७ ऑक्टोबर, २०२२ रोजी एक विचित्र घटना घडली. ‘वूमन ऑन व्हिल्स’ (महिला मोटार ट्रेनिंग स्कुल) याची संस्थापिका अमृता माने या तरुणीसोबत जिवावर बेतणारा एक प्रसंग घडला. ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक लॅपटॉपमधून धूर निघू लागला आणि काही कळायच्या आत लॅपटॉपचा स्फोट झाला. पाहा लॅपटॉपचा स्फोट झाला त्या प्रसंगाचा व्हिडीओ.
आणखी वाचा : एन्ट्री असावी तर अशी! नवी कार घरी आणल्याचा हा व्हिडीओ Viral का होतोय एकदा पाहाच
व्हिडीओ :
नेमकं काय घडलं?
अमृताने ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना या प्रसंगाबाबत अधिक माहिती दिली. तिने सांगितले की, “लॅपटॉपवर रोजच्यासारखे काम सुरू होते, लॅपटॉपचे चार्जिंग संपल्याने त्याला चार्जर कनेक्ट केले. पूर्ण चार्ज होईपर्यंत काम थांबवणे शक्य नसल्याने, चार्जिंग होत असताना मी काम करत होते. तेव्हा अचानक लॅपटॉपमधून धूर निघू लागला आणि त्यातून आग बाहेर पडून स्फोट झाला. लॅपटॉप तसाच उचलून बाहेर टाकला आणि पटकन मेन स्विच बंद केला. त्यामुळे आग पसरली नाही.”
अमृताने पुढे सांगितले, “मला लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करण्याची सवय आहे. नशीबाने हा स्फोट झाला तेव्हा लॅपटॉप टेबलवर होता, नाहीतर काय झाले असते याची कल्पनाही करणे कठीण आहे.”
आणखी वाचा : लॉकडाउनमध्ये केलेल्या मदतीची त्याने ठेवली जाण; अनोख्या मैत्रीचा Viral Video एकदा पाहाच
डेल कंपनीकडे नोंदवण्यात आली तक्रार
हा लॅपटॉप डेल कंपनीचा होता. तक्रार नोंदवण्याबाबत अमृताने सांगितले, “या प्रसंगाबाबत कंपनीकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. पण अजूनही या प्रसंगाची दखल घेण्यात आली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीला संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ‘रिप्लाय मिळण्यासाठी किमान दोन दिवस लागतील’ असा प्रतिसाद मिळाला. तक्रार नोंदवून आता दोन दिवस झाले आहेत. या प्रसंगाचे गांभीर्य कंपनीला अजूनही समजले नसल्याचे जाणवत आहे.”