काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटावर सरकारने बंदी केल्यानंतर देशभरात चलन कलह सुरु झाला आहे. बँकाबाहेर लागलेल्या रांगा आणि व्यवहारात आलेल्या नव्या दोन हजाराच्या नोटांसदर्भात सर्वत्र समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या बँकांमध्ये तासनतास उभा राहुन लोकांच्या हातात दोन हजारच्या नोटा पडल्यानंतर सुट्ट्यापैशाची समस्या निर्माण होत असल्यामुळे नागरिकांच्या नाकी दम आला असताना सोशल मीडियावर दोन हजाराच्या नोटेसंदर्भातील वेगवेगळ्या प्रयोगांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे लोकांमध्ये या नोटेविषयी उत्सुकता दिसून आली होती. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले असल्याच्या चर्चासुद्धा रंगल्या होत्या. त्यामुळे या नोटा व्यवहारात आल्यानंतर नव्या नोटासोबत तरुणाई सेल्फी घेण्यामध्ये दंग झाल्याचे दिसले. सेल्फीनंतर लोक दोन हजाराच्या नोटेवर अनेक प्रयोग करताना दिसत आहे. ही नोट व्यवहारात आल्यानंतर नोटांचा रंग उडत असल्याची चर्चा रंगली त्यानंतर काही लोकांनी या नोटा पाण्यात धुवून त्याची सत्यता प़डताळताना दिसले. नोट पाण्यामध्ये घातल्यानंतर या नोटेचा गुलाबी रंग फिका पडताना दिसतो. नोटेमधील हा प्रयोगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लोक हा एक प्रयोग करुन थांबलेले नाहीत काहींनी तर नव्या नोटेला चुरगळून त्याला नोटांची चाचपणी करताना दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेबरला देशवासियांशी संवाद साधत पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर व्यवहारत आलेल्या दोन  हजार रुपयांच्या नोटा या चर्चेत आल्या आहेत.  या नोटांची रचना अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. या नोटा बोगस नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसविण्यास फायदेशीर ठरतील असा दावा सरकारने केला आहे.

&nb