Viral Video Today: डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात प्लाझ्मा सांगून मोसंबीचा रस चढवल्याचा वाद सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका कुटुंबाने केलेल्या दाव्याप्रमाणे स्थानिक रक्तपेढीने डेंग्यूच्या रुग्णाला प्लाझ्माऐवजी मोसंबीचा रस पुरविला होता, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. ब्लड पॅकमध्ये मोसंबीचा ज्यूस दाखवणारा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पोलीस महानिरीक्षक राकेश सिंह यांनी यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार परिसरात डेंग्यूच्या रुग्णांना बनावट प्लाझ्मा पुरवल्या जात असल्याच्या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी एक तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये ऐकू शकता की, प्रयागराजच्या झालवा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एक माणूस स्कॅम झाल्याचे म्हणत या प्रकरणाची माहिती देत आहे. प्लाझ्माची गरज असताना वैद्यकीय अधिकारी मोसंबीचा रस शरीरात चढवत आहेत असा दावा या व्यक्तीने केला आहे. व्हिडिओमध्ये या व्यक्तीने प्लास्मा पॅक हातात धरलेला दिसत आहे त्यात मोसंबीच्या ज्यूससारखे द्रव दिसत आहे. यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावाही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी एएनआयला सांगितले की, “आम्ही एक टीम घटनास्थळी पाठवली आहे. काही तासांत अहवाल सादर केला जाईल. यात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”असाही विश्वास पाठक यांनी व्यक्त केला.

प्लाझमा ऐवजी मोसंबी ज्यूस

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये एका खोट्या रक्ताच्या पॅकचे सुद्धा प्रकरण समोर आले होते या प्रकरणातही काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची पडताळणी करून त्यावर निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले आहे.

Story img Loader