सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचं लोकांना सध्या वेडच लागलं आहे. खरंतर सध्या लोक याकडे एक उत्पन्नाचं साहित्य म्हणून पाहातात. तसेच तुमचे जितके जास्त फॉलोअर्स तितके जास्त पैसे कमावता येणार. काही लोक खरोखरंच खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर काही लोक हे प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दर्शवतात. ज्यामध्ये ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाही. ज्यामुळे कधीकधी एकाद्याचा जीव जातो, तर काही गंभीर जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला की तो काही वेळात संपूर्ण जगभरात पसरतो. सध्या फायर पानसारखंच फायर शॉटची फॅशन तरुणाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बार आणि पब्समध्ये तरुण वर्गाकडून फायर शॉटला मोठी मागणी असते. पण अनेकवेळा फायर शॉटमुळे अपघातही घडतात. अशीच घटना एका तरुणीसोबत घडली आहे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क

फायर शॉटचा नाद तरुणीच्या अंगलट

तरुण-तरुणींचा एक ग्रुप हॉटेलमध्ये एका टेबलाजवळ बसलेले या व्हिडिओत दिसत आहेत. एक वेटर त्या टेबलावर एक प्लेट ठेऊन त्यावर फायर शॉट बनवत असताना दिसतोय. प्लेटवर असलेल्या एका काचेच्या ग्लासात मद्य टाकलं जातं, त्यात विविध फ्लेवर्स मिसळले जातात आणि मद्याला आग लावली जाते. मात्र असं करत असताना अचानक आगीने पेट घेतला आणि टेबलाजवळ बसलेली एक तरुणी यात होरपळताना या व्हिडिओत दिसत आहे. त्या तरुणीच्या कपड्यांनाही आग लागली आणि ती खाली पडली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – viral video: वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! खतरनाक वाघाचा थेट पर्यटकांवर हल्ला

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तुम्ही देखील अशा व्हिडीओंना उदाहरण म्हणून घ्या आणि आयुष्यात असा मुर्खपणा करु नका आणि इतरांना ही असं करण्यापासून थांबवा.