Viral Video: खात्यातील शिल्लक पैसे तपासणे, निधी हस्तांतरित करणे आदी गोष्टी करण्यासाठी अनेक जण बँकेत जातात. बँकेत चेक डिपॉझिट करताना किंवा एखादा फॉर्म भरताना अनेकांची रक्कम, बँक अकाउंट नंबर, स्वतःची माहिती लिहिण्यात तारांबळ उडते आणि अनेक जण अगदीच मजेशीर चुका करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट स्लिपचा एक फोटो आहे आणि महिलेने या फोटोतील स्लिपमध्ये ‘रक्कम’ कॉलम भरताना एक मजेशीर चूक केली आहे.
व्हायरल व्हिडीओ बँकेतील आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक महिला तिच्या बँक अकाउंटमध्ये दोन हजार रुपये जमा करण्यास आली होती. महिलेने त्यासाठी डिपॉझिट स्लिप भरण्यास सुरुवात केली. स्वतःचे नाव, खाते क्रमांक आदी माहिती तिने अचूक भरली. पण, डिपॉझिट स्लिपमध्ये रकमेचा कॉलम हिंदी भाषांतरात ‘राशी’ असाही लिहिला होता. त्या भाषांतरामुळे महिला गोंधळून गेली आणि तिने मजेशीर चूक केली हे पाहून बँक कर्मचाऱ्यांनासुद्धा धक्का बसला. नेमके काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
स्टेट बँक ऑफ इंडियाची डिपॉझिट स्लिप संगीता नावाच्या महिलेची आहे. १८ जून रोजी तिने तिच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले. तिने खाते क्रमांक, नाव आदी सर्व माहिती अचूक भरली. परंतु, डिपॉझिट स्लिपमध्ये रकमेच्या कॉलममध्ये हिंदी भाषांतरात ‘राशी’ असे लिहिलेले होते. त्या भाषांतरीत शब्दामुळे गोंधळलेल्या महिलेने स्वतःची राशी (Zodiac sign) तुला (Libra) असे हिंदीत लिहिते. हे पाहून बँक कर्मचाऱ्यांना धक्काच बसला आणि या मजेशीर घटनेचा एक व्हिडीओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Smartprem19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘ बँक कर्मचारी शॉक’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण यात महिलेची काय चूक, असे म्हणत आहेत; तर अनेक जण या व्हिडीओच्या सत्यतेबाबत शंका घेत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत; ज्या तुम्हालाही हसायला नक्की भाग पाडतील.