रागाच्या भरात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. रागात करण्यात आलेल्या गोष्टीचा परत त्या व्यक्तीला पश्चाताप होतो. असाच काहीसा धक्कादायक प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात कंडोम लावलेलं पूर्ण केळ गिळून टाकलं. यानंतर या व्यक्तीला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. हा व्यक्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेल्यावर डॉक्टरही चकीत झाले होते.

कंडोमसह केळ गिळल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. ‘क्युरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्स’ने याप्रकरणाचा अभ्यास केला. त्यानंतर याचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा : रस्त्यावर पडलेल्या जखमी कुत्र्याला मिळाले जीवनदान; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच

‘क्युरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्स’ने सांगितल्यानुसार, कंडोम गिळणारा हा व्यक्ती ३४ वर्षीय आहे. या व्यक्तीने रागाच्या भरात केळ गिळू टाकलं. नंतर या व्यक्तीच्या पोटात दुखू लागलं. काही खालं तरी व्यक्तीला त्रास होत होता. उलट्या आणि मळमळ याने तो हैराण झाला. पाणी पिलं तरी सहन होईना. त्रास वाढल्यानंतर व्यक्ती रुग्णालयात गेला.

हेही वाचा : या विभागात नोकरीची सुवर्ण संधी; दर महिन्याचा पगार लाखाच्या घरात, वयोमर्यादा किती? वाचा सविस्तर

रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचं सीटी स्कॅन केलं. परंतु, सीटी स्कॅनचा अहवाल समोर आल्यावर डॉक्टरही चकीत झाले. यामध्ये रुग्णाच्या आतड्यात कंडोमसह केळ अडकल्याचं अहवालात डॉक्टरांना दिसलं. परत, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन ते केळ बाहेर काढले. त्यानंतर तीन दिवसांनी त्या व्यक्तीला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. आता तो व्यक्ती खाऊ-पिऊ शकतो.

Story img Loader