महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होते आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे तो त्यांचा व्हायरल झालेला फोटो आणि अधिवेशनात जात असताना त्यांनी केलेली एक कृती. आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शोक प्रस्ताव सादर झाल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. विधान परिषदेत अधिवेशनाची सुरुवात होताच नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच शेकापचे जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. तर सभागृहाच्या बाहेरही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांची कृती लक्ष वेधून घेते आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोत?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत पाऊस पडत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी छत्री हातात धरली होती त्यावेळी चालत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पायातले बूट काढून हातात घेतले. बूट हातात घेऊन अनवाणी पायाने देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत पोहचले. बूट पाण्यात भिजू नयेत आणि बुटांची घाण सभागृहात लागू नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचं चांगलंच कौतुक होतं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी इन्सपायरिंग असा शब्द लिहिला आहे. त्यानंतर त्यांनी हा फोटो ट्वीट केला आहे.

Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनीही हाच फोटो ट्वीट केला आहे. भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा हा साधेपणा भावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे असं म्हणत काही नेटकऱ्यांनीही हा फोटो ट्वीट केला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जेव्हा नीलम गोऱ्हे यांच्या पदावरच आक्षेप घेतला गेला तेव्हा पॉईंट ऑफर ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. तसंच विधानसभेतही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाताले मुत्सदी नेते म्हणून ओळखले जातात. अशात आता त्यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होताना दिसते आहे.

Story img Loader