पुणे शहरात गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक राजकारणी मुंबई पुण्यातल्या मोठ्या गणपती मंडळांना भेट देत असतात. गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेत असतात. तासंतास रांगेत उभे राहतात. गणपतीचे १२ दिवस रांग २४ तास सुरू असते. बाप्पाच्या पायाशी दर्शन मिळणं हे नशीबच समजलं जातं. शहरातली श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी पुणेकरांनी रांगा लावल्यात. अनेक कलाकार, राजकीय नेते, आणि क्रिकेटपटूही बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलं. एवढच नाहीतर यावेळी अजित पवारांनी पुणेरी ढोलही वाजवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दगडूशेठ गणपती बाप्पाच्या प्रवेशद्वारातून अजित पवार आत येत असताना त्यांच्या स्वागताला ढोल-ताशा वाजत होते. यावेळी तिथलाच एक ढोल वादनाचा अजित पवारांनी मनसोक्त आनंद घेतला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: लालबागच्या गर्दीत अडकला “आयुष्मान खुराना”; राजाच्या दरबारात प्रवेश करताच झालेला प्रकार कॅमेरात कैद
अजित पवारांचं म्ण किंवा इतर कुुणा राजकारण्यांचं म्हणा, कधीतरी अशी दुसरी बाजू पाहायला मिळते. हा व्हिडीओ त्याचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात शेअर करत आहेत. नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.