काश्मीरमधील सकारात्मक बदलांबद्दल बोलणारे दोन उदयोन्मुख काश्मिरी कलाकारांचे एक रॅप गाणे इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत आहे. रॅपर ‘हुमैरा जान’ आणि ‘एमसी रा’ यांचे ‘बदलता काश्मीर’ हे गाणे काश्मीरच्या खोऱ्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर आधारित आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
या गाण्यात ‘नवा काश्मीर’ या विषयावर भर देण्यात आला असून काश्मीरमध्ये होत असलेला विकास तरुणांनी शब्दात मांडला आहे. या गाण्यात काश्मीरमधील G20 बैठक, अमरनाथ यात्रा, पर्यटनातील सुधारणा आणि डिजिटल इंडियाच्या प्रगतीचाही उल्लेख आहे.
भारत सरकारनेही शेअर केले
भारत सरकारच्या वेब पोर्टलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॅप्शनसह शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘काश्मीरचे तरुण व्यक्त होत आहेत आणि तेही एका रॅप साँगद्वारे. नवीन काश्मीरचे प्रतिबिंब दाखवणारे हे गाणे ऐका. अनेक नामवंत व्यक्तींनी हे रॅप सोशल मीडियावर आपल्या कोट्ससह शेअर केले आहेत.
या सेलिब्रिटींनी कौतुक केले
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने त्याच्या एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, ‘या काश्मिरी कलाकाराने प्रो-लेव्हल रॅपिंगचे प्रदर्शन केले, खूप चांगले.’ माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियानेही व्हिडिओ शेअर केला आणि ‘हा अप्रतिम रॅप पाहा.’