सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओपैकी एक म्हणजे लग्नाच्या संगीतचे डान्स परफॉर्मन्स. कित्येकदा सोशल मीडियावर एका पेक्षा एक वरचढ असे डान्स परफॉर्मन्स व्हायरल होत असतात. सध्या असा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे यामध्ये एका नववधूने अफलातून डान्स परफॉर्मन्स दिला आहे पण तिच्या हटके स्टाईलमध्ये! नववधूने तिच्या जबरदस्त डान्सने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह सर्वांनाच सरप्राईज दिलं आहे. असा संगीत व्हिडीओ तुम्ही कधीही पाहिला नसेल.

१५ किलोचा लेहेंग्यामध्ये रोलर स्केट्स घालून नवरीने केला डान्स

सध्या व्हायरल होत असलेल्या संगीत व्हिडिओमध्ये या नवरीने लेहेंगा घातला असून, त्यावर रोलर स्केट्स घालून ती नाचताना दिसत आहे. या नववधूने ‘बार बार देखो’ चित्रपटातील ‘सौ असमान को’ या गाण्यावर हा डान्स केला आहे. कित्येकांना रोलर स्केट्स घालून चालताही येत नाही मात्र ही नवरी अगदी सहजपणे रोलर स्केट्स वापरून डान्स करत होती. संगीतचा हा व्हिडिओ सर्वांना प्रचंड आवडला आहे. सोशल मीडियावर या नववधूला पाहून सर्व मुलींना तिचा हेवा वाटत आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास १.७ दशलक्षवेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये, तुम्ही वधूने १५ किलोचा लेहेंगा घातलेला असूनही तिने आनंदाने आणि अतिशय सुंदर पद्धतीने डान्स केला. तिचा हा थक्क करणारा डान्स प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारा आहे. उपस्थित पाहुण्यांनी तिचे कौतूक केले.

हेही वाचा – अन् बघता बघता पठ्ठ्याने टाईल्सपासून तयार केलं असं काही…नेटकऱ्यांना मोहित करणारा Video पाहाच!

नववधूने अफलातून डान्स पाहिला का?

“पहिल्यांदाच रोलर स्केट्स घालून नववधूने परफॉर्मन्स करून संगीत कार्यक्रमाला एका नेक्स्ट लेव्हलला नेले आहे! असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ इंस्टाग्रमावर शेअर केला आहे. नववधू अमरीनला तिचा होणारा नवरा साहिल भगतला सरप्राईज द्यायचे होते कारण ती स्केटिंग करते हे माहीत असूनही त्याने मला कधीही परफॉर्म करताना पाहिलेले नव्हते. म्हणूनच या नववधूने अफलातून डान्स करत आपले प्रेम व्यक्त केले आहे

हेही वाचा – टेंशनमध्ये आहे हा देश! ११ वर्षांची मुलं सुद्धा डायपर घालून शाळेत येतात, म्हणे, ”टॉयलेट कसे…”

नेटकऱ्यांनी केलं कौतूक

नववधूच्या या डान्सचे कित्येकांनी कौतूक केले पण काहींनी त्यावरून तिला ट्रोलही केले. एकाने म्हटले की, ”हा स्टंट टाळता आला असता कारण ते वधूसाठी धोकादायक असू शकते.” एका युजरने लिहिले की, “त्या २० किलोच्या लेहेंगाच्या खाली माझ्या हिल्सध्ये परफॉर्म करण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला, येथे ही महिला रोलर स्केट्सवर डान्स करत आहे.”

तुम्हाला हा डान्स व्हिडिओ कसा वाटला ? आम्हाला नक्की कळवा.

Story img Loader