सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा हे व्हिडीओ अतिशय मनोरंजक असतात तर अनेकदा हैराण करणारे. काही व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांची मनं जिंकतात. असाच एका नव्या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलीच्या लग्न होत असल्याच्या आनंदात आईने इतका जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला की, तो पाहून नव्या नवरीचे डोळे पाणावले. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरीचे आई आणि वडील दोघेही स्टेजवर डान्स करताना दिसून येत आहेत. ‘कल हो ना हो’ या फिल्ममधल्या ‘माही वे’ गाण्यावर आईने डान्स करण्यास सुरूवात करते. हे पाहून आई वडिलांच्या मधोमध उभी असलेली नवी नवरी इमोशनल झालेली दिसून येतेय. त्यानंतर काही वेळ तरी नवरीच्या पेरेंट्सने कसं तरी स्वतःला सांभाळलं आणि आपला डान्स परफॉर्मन्स सुरू ठेवला. नवी नवरी तिच्या हातांनी अश्रु पुसताना दिसून येतेय. आकर्षक लेहेंगामध्ये ही नववधू खूपच सुंदर दिसतेय. लग्नात आलेले पाहुणेही इमोशनल होतात.
‘roll_camera_dance’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘लगती है तू कितनी प्यार रे’ अशी कॅप्शन लिहित त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ५२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर ५१ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.