जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्या विचित्र आयडियांनी सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. कोण कशापासून कधी काय बनवेल आणि जुगाड करेल सांगता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात विशेषत: उन्हाळ्यात गरमीपासून वाचण्यासाठी लोक अनेक देसी जुगाड ट्राय करत आहेत. कारण भीषण उन्हामुळे खूप हैराण व्हायला होत आहे. यामुळे उन्हाळ्यात गारव्याचा आनंद लुटण्यासाठी एका व्यक्तीने असा देसी जुगाड केला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
तुम्हीही हा देसी जुगाड पाहून त्या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडीओमध्ये पाहू शकता, एका व्यक्तीने केवळ १० रुपये खर्च करून जुन्या कूलरपासून एक एसी तयार केला आहे. यासाठी त्याने काही फुटलेली मडकी वापरली आहेत. तरुणाने देसी जुगाड करत तयार केलेला एसी पाहून युजर्सदेखील आश्चर्यचकित झाले आहेत, तर दुसरीकडे काही युजर्स उन्हात दिलासा देणारा हा अप्रतिम व्हिडीओ पाहून त्या व्यक्तीच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत.
गर्मीत थंडीची मज्जा, तरुणाने तयार केला एसी
जगभर जुगाडबाज लोकांची कमी नाही, जे आपला जुगाड दाखवून चकित करतात. व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक व्यक्ती काही मातीची मडकी फोडून एका खराब कूलरच्या तळाशी टाकते. त्यानंतर एक तळाशी फोडलेले मडके कूलरच्या मधोमध ठेवते आणि त्यात पाईप बसवून कूलरमध्ये पाणी भरते. यानंतर कूलर ऑन करते, आता पुढे काय होते ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्यक्तीनेही अवघ्या १० रुपयांमध्ये हा देसी जुगाड केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील काही युजर्सदेखील हा देसी जुगाड वापरून उन्हाळ्यात एसीच्या थंड हवेचा आनंद घेऊ इच्छित आहेत.
देसी जुगाडचा अप्रतिम व्हिडीओ व्हायरल
हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. २० मे रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘होममेड एसी फक्त १० रुपयांमध्ये.’ पाच दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ८ लाख ५४ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिलेले यूजर्स त्यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत. त्याच वेळी काही युजर्स त्या व्यक्तीच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत.