नवरा बायकोचं नातं हे खूप नाजूक असतं. इतर कोणत्याही नात्यांमध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायकोमध्ये असते. नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. असाच काहीसा प्रयत्न एका नवऱ्यानं त्याच्या बायकोसाठी केला आहे. नवऱ्यानं आपल्या बायकोला स्वत:च्या हातानं पत्र लिहून दिलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
“इन्सान का सबसे बेहतरीन साथी उसकी सेहत है”
आज-कालचे पालक काळानुसार बदलणारे आहेत, आजूबाजूला होणारे बदल स्विकारून त्यांनी तंत्रज्ञानाबरोबरच स्वत:लाही अपडेट केलं आहे. मात्र अजूनही एक पिढी अशी आहे जी, इंटरनेटच्या जगापासून लांब आहे. पण तरीही काळानुसार बदलण्याचा प्रयत्न करते. सध्या अशाच एका वृद्ध जोडप्याच्या प्रेमाची चर्चा सुरु आहे. एका नवऱ्यानं आल्या बायकोला पत्र लिहलं आहे. या पत्रावर त्यांनी “इन्सान का सबसे बेहतरीन साथी उसकी सेहत है, अगर उस का साथ छूट जाए, तो वह हर रिश्ते के लिए बोझ बन जाता है!” असा आशय लिहला आहे. हे लेटर या व्यक्तीच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्याचं झालं असं की या व्यक्तीने हा मॅसेज फेसबूकवर वाचला होता, मात्र त्यांना ते डाऊनलड करता आलं नाही, त्यामुळे त्यांनी हे स्वत: एका कागदावर लिहून त्यांच्या बायकोला पाठवलं.
“माणसाचा सर्वात सुंदर साथीदार हे त्याचं आरोग्य असतं, जर त्याची साथ सुटली तर सगळ्या नात्यांसाठी आपण ओझं बनतो”. बायकोनी तब्येतीची काळजी घ्यावी असा या पत्रामागचा उद्देश आहे.
वाचा पत्र
हेही वाचा – अचानक घराखालून जमीन सरकू लागली, अनेक जीव गाडले गेले, हिमाचलमधून समोर आला एक भयानक VIDEO
हे पत्र आपल्याला प्रेमाच्या साधेपणाची आणि आपल्या नातेसंबंधांची काळजी घेण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतात. ही मानपासून केलेली कृती आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनवतात. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांचं कौतूक केलं आहे. जुन्या पिढ्यांची नाती टिकण्याची हिचं कारणं असल्याचं नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे.