Desi Groom Video : लग्नात नवरीच्या पाठवणीच्या वेळी नवरीचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य भावुक झाल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये मंडपात येण्यापूर्वी नवरीला पाहून नवरदेवाला रडू कोसळलं. नवरी नवरदेवाला भेटायला आली तेव्हा त्याला आनंदाश्रू अनावर झाले. त्याच्या मनात भावभावनांचा कल्लोळ इतका माजला की शेवटी त्याला सावरणंही कठीण झालं. लग्नात आपण नवरीला रडताना पाहतोच. पण नवरदेव रडतानाचा हा व्हिडीओ पाहून सगळेच जण भावुक होत आहेत.
सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात नवरीपेक्षा नवराच जास्त इमोशनल झाल्याचं दिसतं आहे. नवरीला पाहताच नवऱ्याला रडू कोसळलं आहे. लग्नात नवरदेवाचा काही एक वेगळाच रूबाब असतो. आपण आपल्या नवरीला वाजतगाजत घरी नेणार याचा आनंद, उत्साह त्याच्या चेहऱ्यावर असतो. नवरा शक्यतो कधीच रडताना दिसत नाही. त्यामुळे या नवऱ्याला असं रडताना पाहून नेमकं झालं तरी काय, असा प्रश्न नक्कीच पडतो.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांसमोर उभे असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने एक सुंदर रेड-ऑफ व्हाईट कलरचा लेहेंगा परिधान करत अगदी नववधूचा साज श्रृंगार करून लग्नमंडपात प्रवेश करते. त्याची होणारी पत्नी ही लग्नाच्या दिवशी नटून थटून आलीय आणि त्याच्यासमोर उभीय. तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहतो. ती फारच सुंदर दिसत असल्याने हा नवरा क्षणभर तिला पाहत राहतो.
आणखी वाचा : MBBS डॉक्टरने शेण खाल्लं…म्हणतो यात व्हिटॅमिन असतं! पाहा हा VIRAL VIDEO
आणखी वाचा : हे काय? माणसाचा पुतळा अचानक उठू लागला… हा खतरनाक VIRAL VIDEO पाहून तुम्हीही घाबराल
आपल्या भावी पत्नीला नववधूच्या रुपात पाहून तो अगदीच भावुक होतो. त्याला पाहून मंडपातील इतर पाहूणे देखील भावुक होताना दिसून येत आहेत. नवऱ्याने तिला पाहताच, तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रु तरंगताना दिसून येतात. यानंतर आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक त्याला गप्प करतात. हा एक अतिशय भावूक व्हिडीओ आहे आणि नवरी देखील तिच्या भावी पतीचा हा लूक पाहून आश्चर्यचकित झाली आहे. शेकडो लोक आता हा व्हिडीओ पाहत आहेत आणि या गोंडस भावनिक क्षणाला खूप प्रेम देत आहेत.