भारत एक असा देश आहे जिथे लोक त्यांचे काम करण्यासाठी देसी जुगाडचा अवलंब करतात. जुगाड कोणतेही काम सोपे करते. यासोबतच कमी पैशातही अशक्य कामे शक्य होतात. एका शेतकऱ्याने कार मेड बाय जुगाड मधून अशी कार बनवली, ज्यामध्ये आता त्याचे संपूर्ण कुटुंब बसून फिरायला जाऊ शकते.
इंजीनियरचही डोक चाक्रवेल
चांगली गोष्ट म्हणजे हा जुगाड बसवल्यानंतर त्याचा वाहतुकीचा प्रश्न सुटला, कारण शेतकऱ्याकडे ना वाहन होते ना सायकल. शेतकऱ्याचा हा जुगाड बघून सगळ्यात मोठ्या इंजिनियरचेही डोक थक्क होईल. ही कार पाहून तुम्हीही शेतकऱ्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. घरात पडलेल्या कबाड़ शेतकऱ्याने ही गाडी तयार केली.
( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )
शेतकऱ्याकडे सायकलही नव्हती
शेतकऱ्याच्या जुगाड गाडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणू शकाल की हा जुगाड खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतकऱ्याकडे कार आणि सायकल नव्हती, त्यानंतर त्याने कुटुंबासह फिरण्यासाठी हे अनोखे वाहन बनवले. हा व्हिडीओ jugaadu_life_hacks नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
( हे ही वाचा: १८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी )
( हे ही वाचा: Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया )
४-५ लोक बसून फिरायला जाऊ शकतात
एक शेतकरी पॅडल घेऊन विचित्र कार सुरू करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. या गाडीला चार छोटी चाके आहेत. या वाहनाची बॉडी अॅल्युमिनियमची आहे. गाडी बघून असे वाटते की त्यात ४-५ जण आरामात बसून फिरायला जाऊ शकतात. या वाहनात स्टीयरिंग देखील उपलब्ध आहे, तर स्टीअरिंगच्या शेजारी जनरेटर बसवलेला आहे. या जनरेटरने कार सुरू होते आणि चालते.