Desi Jugaad Video: आपल्या देशातील लोक जुगाड करण्यात अव्वल आहेत. कशापासून कधी काय बनवतील याचा नेम नाही. जुगाडू लोकांचे अनेक जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. आपण विचारही करू शकत नाही असा जुगाड लोक करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एका तरुणानं बाईकचा असा जुगाड केलाय. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही थक्क होऊन जाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

तुम्ही सात सीटर बाईक पाहिली आहे का?

तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारची वाहने पाहिली असतील. आज आपण बाईकबद्दल बोलणार आहोत. दुचाकीवर किती लोक बसू शकतात? ज्यांना नियमाची माहिती आहे, त्यांच्यासाठी उत्तर दोन असेल. मात्र, काही लोक नियम मोडून दुचाकीवर तीन ते चार जणांना बसवतात. वाहतूक नियमाप्रमाणे बाईकवर दोनच व्यक्ती बसू शकतात. पण, या जुगाडू मुलाच्या बाईकवर एक-दोन नव्हे तर सात जण बसले आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बाईकवर सात जण बसलेले दिसले, हे पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत.

Shocking video guy on Bike was Harrasing the School girls Got Good treatment from Police
VIDEO: आता तर हद्दच पार केली! बाईकवर आला अन् महिलेला अश्लिल स्पर्श करुन गेला; मात्र पुढे काय घडलं ते पाहाच
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of Bike fell on boy accident viral video on social media
चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…, खेळता खेळता खेळता घडली दुर्घटना! पाहा धक्कादायक VIDEO
Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Pune Rikshaw Driver Desi Jugaad
‘पुणे तिथे काय उणे…’ थंडीत रिक्षा चालवण्यासाठी रिक्षाचालकाचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
Bike Hit Scorpio car shocking accident video
बाईकची स्कॉर्पिओला जोरदार धडक अन् पुढे जे घडलं, ते चमत्कारापेक्षा कमी नाही, VIDEO मध्ये पाहा थरकाप उडवणारा अपघात
Traffic police and bikers trending video viral
आतापर्यंतचा सर्वात भारी VIDEO, १९ लाखांची बाईक बघून ट्रॅफिक पोलिसानी तरुणांना थांबवलं अन् पुढे काय केलं पाहाच
Uncle dangerous stunt on scooty video viral shocking video on social media
ओ काका जरा दमानं! उलटे उभे राहून बाईक चालवायला गेले अन्… विचित्र स्टंटबाजीचा VIDEO होतोय व्हायरल

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने दोन पावले पुढे जाऊन बाईकमध्ये बदल करून ती सात सीटर बनवली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एकाच बाईकवर सात जण बसलेले दिसत आहेत. त्या व्यक्तीने एक लोखंडी सीट बनवली आहे आणि ती बाईकच्या मागच्या बाजूला बसवली आहे आणि स्वतः व्यतिरिक्त सहा लोक बाईकवर बसलेले आहेत. जुगाडी बाईकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : पाकिस्तानी विद्यार्थ्याची फिजिक्सची उत्तरपत्रिका वाचून थांबणार नाही हसू; उत्तर वाचून शिक्षकही… )

व्हायरल व्हिडिओ येथे पहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर  bhupendra_singh_39t नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये विचारले, “तुम्हाला सात सीटर बाईक कशी वाटली?’ वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडीओ १४.४ दशलक्ष लोकांनी पाहिला असून पाच लाख २१ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “सात सीटर कार खरेदी करण्याच्या विचारात होतो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर योजना रद्द केली.” असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्हीदेखील आपल्या गमतीशीर प्रतिक्रिया नक्की द्या.

Story img Loader