Jugaad For Wall Plaster Video Viral : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मोठे कंत्राट दिल्यानंतर खिशाला कात्री लागते. वाढत्या महागाईमुळं बांधकामाच्या सामानासह कामगारांची मजुरीही देणं परवडणारं नसतं. त्यामुळे अनेक लोक भिंतींचे बांधकाम करण्यासाठी देशी जुगाड करतात. अशाच प्रकारचा जुगाडाचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. इमारतीचे बांधकाम करत असताना अनेक कामगार घाईगडबडीत काम करत असतात. त्यामुळे कमी वेळात जास्त बांधकाम करण्यासाठी लोक देशी जुगाड करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी भन्नाट जुगाड करून एक जबरदस्त मशिन बनवण्यात आलीय. या मशिनच्या माध्यमातून भिंतीला योग्य प्रकारे प्लास्टर करण्यात येत आहे. एक व्यक्ती प्लास्टरसाठी बनवण्यात आलेलं मिश्रण त्या मशिनमध्ये टाकतो आणि त्यानंतर मशिन आपोआप त्या भिंतीवर प्लास्टर करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ते प्लास्टर भिंतीला योग्यप्रकारे फिट होत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला असून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांच्या वर्षाव केला आहे.

नक्की वाचा – कपिल देव, गावसकर, वेंगसरकर नव्हे! ‘या’ व्यक्तीनं सचिन तेंडुलकरला दिली १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय Cricket खेळण्याची संधी

एका यूजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, अशाप्रकारच्या मशिनवर बंदी घालण्यात यावी, अशी मी सरकारला विनंती करतो. अन्यथा गरिब कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. दुसरा यूजर म्हणाला, माझ्या घराचं प्लास्टरचं काम सुरु आहे. थोड्याशा कामासाठी दहा दिवस लागले आहेत. मला या मशिनची खूप आवश्यकता आहे. अन्य एक यूजर म्हणाला, सर्व काम मशिन करत असेल, तर माणूस काय करणार? कामगार थकले आहेत आणि आळशी झाले आहेत. त्यामुळे मशिन चालवत आहेत, असंही एका यूजरने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi jugaad for building wall plaster it helps to do construction speedily and saves time too instagram video viral nss