बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘गोलमाल’मध्ये अभिनेता अजय देवगणला मॉडिफाइड बाइक चालवताना तुम्ही पाहिलं असेल, पण खऱ्या आयुष्यात अशी बाइक पाहिली आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही बाईक दाखवत आहोत. ज्यामध्ये एक-दोन नव्हे तर अनेक जण बसू शकतात. तुम्ही मॉडिफाईड बाइक्स तर खूप पाहिल्या असतील, पण तुम्ही कधी अर्धा डझनहून अधिक लोकांना बसता येईल अशी बाईक बघितली आहे का?
बनवली जुगाड बाईक
दुचाकीवर सहसा दोनच जणांना बसण्याची परवानगी असते. दोनपेक्षा जास्त लोक बसल्यास कायदा मोडल्यास दंड भरावा लागतो. मात्र, एका व्यक्तीने आपली बाइक जुगाड करत इतकी मोठी बनवली, की तुम्ही विचारही करू शकत नाही. या जुगाडू बाइकवर एक-दोन नव्हे तर अर्धा डझनहून अधिक लोक बसू शकतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहता हा भारताबाहेरचा दिसत आहे.
(हे ही वाचा: कोविडचा नवा प्रोटोकॉल पाहून व्हाल हैराण! IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला फोटो होतोय Viral)
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चालक सुमारे १० फूट लांब बाईकवर बसला आहे. नंतर एक एक करून लोक सीटवरची जागा संपेपर्यंत बसताना दिसत आहे. बाईक चालका सह ८ लोक यावर बसतात.संपत असल्याचे दिसत नाही.
(हे ही वाचा: Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय)
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर मिमवाला न्यूज अकाऊंटने हे शेअर केले आहे.