देशाच्या कानाकोपऱ्यात जुगाडू लोकांची कमतरता नाही. विशेष म्हणजे कमी सुविधांमध्येही हे लोक कधी काय बनवतील याचा काही नेम नाही. याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा आपल्याला वाहनांवर केलेल्या देसी जुगाडचे व्हिडीओ पाहायला मिळतात. अशाच प्रकारचा एक सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ट्रक चालक ट्रकचे टायर फुटले तर चालक ते गॅरेजमध्ये जाऊन बदलून घेतो. पण व्हिडीओत एका ट्रक चालकाने भलताच कारनामा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत चालकाने ट्रकचे टायर फुटल्याने एक जीवघेणा जुगाड केला आहे. जो कधीही जीवावर बेतू शकतो.

तीन चाकांवर धावला ट्रक

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जुगाड करत तीन चाकांवर चक्क एक चारचाकी ट्रक चालवताना दिसत आहे. यातील ट्रकचे मागचे एक मागचे टायर गायब असल्याचे दिसतेय. पण तरीही चालकाने ट्रकच्या खालच्या बाजूने एक एक लाकडी फळी बांधून मागच्या टायरच्या लोखंडी भागाखाली सपोर्ट म्हणून टाकली. टायर लावून घेण्याऐवजी त्याने अशाप्रकारे जीवघेणा प्रकार केला आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Truck and bike accident bike rider caught fire in telangana shocking accident video viral
ट्रकने धडक देताच दुचाकीने घेतला पेट, माणूस आगीत होरपळला अन्…, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल
Three youths killed in car accident on Daryapur Akola road amravati
अमरावती: दोन कार समोरासमोर धडकल्या; तीन युवक ठार, तीन जखमी
Video: Nearly 25 Bikes Skid In Hyderabad After Oil Tanker Spills Fuel On Kushaiguda-Nagaram Road shocking video
भयंकर! एका मागोमाग २५ बाईकचा थरारक अपघात; भर रस्त्यात असं नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल

राजेश शाह (@RajeshS48060660) नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, जुगाडसाठी कायपण, हे शाळेत कोणालाही शिकवले जात नाही. या व्हिडीओमध्ये एका चार चाकी ट्रकचे टायर निखळल्याचे दिसून येत आहे. तरीही ट्रक रस्त्याने भरधाव वेगात पळण्यासाठी चालकाने एक लाकडी फळीची मदत घेतली आहे.

७ ऑगस्ट रोजी पोस्ट केलेला व्हिडीओ पाहण्यात लोक प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत. विशेष बाब म्हणजे ट्रकचे टायर बदलण्याऐवजी हा विचार करणे प्रत्येकालाच जमत नाही. पण असे करणे अनेकदा जीवावर देखील बेतू शकते.

Story img Loader