Pizza Making Jugaad Viral Video : ऑफिसमध्ये बसल्या- बसल्या अनेकदा पिझ्झाा खाण्याची खूप इच्छा होते, पण काहीवेळा ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. पण विचार करा, तुम्हाला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली आणि बसल्या-बसल्या तुमच्या हातात पिझ्झा आला तर? तुम्हाला हे कदाचित अशक्य वाटेल, पण एक कर्मचाऱ्याने हे शक्य करुन दाखवलं आहे. या कर्मचाऱ्याने चक्क ऑफिस डेबललाच पिझ्झा ओव्हन बनवत त्यात गरमा-गरम टेस्टी पिझ्झा बनवला आहे. कर्मचाऱ्याने पिझ्झा बनवण्यासाठी केलेला देसी जुगाड व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑफिसमध्ये अनेक जण ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करतात. पण ही ऑर्डर येईपर्यंत खूप वेळा जातो आणि पिझ्झा थंड होतो. थंड पिझ्झा अजिबात टेस्टी लागत नाही, त्यामुळे आपल्याला पिझ्झा खाण्याची पाहिजे तशी मज्जा घेता येत नाही. अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याने चक्क ऑफिसच्या डेबलमध्येच पिझ्झा बनवण्यासाठी एक सोय केली आहे. ही पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कर्मचारी ऑफिसलच्या डेबलला ड्रिल मशीनने होल करतो. यानंतर पाण्याच्या स्टीलच्या बॉटलचा खालचा भाग कट करून वरचा भाग त्या होलमध्ये फिट करतो यानंतर डेबलच्या सर्वात खालल्या रॅकमध्ये ग्रेटर लावून कोळसा भरण्यासाठी एक सोय करतो. तर दुसऱ्या रॅकमध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवतो, त्यावर चीजचे बारीक तुकडे आणि इतर पदार्थ तो व्यवस्थित टाकून घेतो. यानंतर काहीवेळात त्याचा पिझ्झा चांगल्या प्रकारे बेक होऊन खाण्यासाठी तयार होतो. खरोखर, ही अनोखी पद्धत क्वचितच कोणी शोधून काढली असेल.

ट्विटरवर (@pareekhjain) नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की – जेव्हा इंजिनिअरला ऑफिसमध्ये पिझ्झा खाण्याची इच्छा होते. या व्हिडिओला आत्तापर्यंत १ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘बेरोजगार आहे असा वाटतोय.’ तर दुसर्‍या एका युजरने लिहिले की, पिझ्झाच्या नादात हा ऑफिस जाळेल.