बंगला, फ्लॅट्समध्ये किचनच्या शेजारी एक छोटेसे डायनिंग टेबल असते. त्याच्या आजूबाजूला सर्व कुटुंब एकत्र बसून जेवणाचा आनंद घेते. हे डायनिंग टेबल्स सहसा लाकडाचे किंवा काचेच्या स्टायलिश डिझाइनचे असतं. पण, तुम्ही कधी चाकापासून तयार केलेले डायनिंग टेबल पाहिले आहे का ? पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका युजरने अनोखी शक्कल लावून घरच्या घरी डायनिंग टेबल तयार केले आहे.

एका तरुणाने सायकलच्या चाकापासून फाइव्ह स्टार हॉटेलप्रमाणे आकर्षक डायनिंग टेबल तयार केले आहे. तुम्ही पाहू शकता की, जमिनीवर एक लाकूड उभे करून, त्यावर सायकलचे चाक आडवे ठेवले आहे आणि या चाकावर जेवणासाठी तरुणाने अनेक पदार्थांची रचना करून घेतली आहे. चाक फिरविताच तरुणाला पाहिजे त्या पदार्थाची प्लेट समोर येईल आणि तो जेवणाचा आनंद घेऊ शकेल. तुम्हीसुद्धा पाहा सायकलच्या चाकापासून कसे तयार केलेय हे डायनिंग टेबल.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

हेही वाचा…VIDEO: गच्चीवर तरुणांचा रंगला ‘असा’ फूटबॉल सामना की, पाहून हर्ष गोएंकाही झाले थक्क म्हणाले; ‘व्वा याला म्हणतात…’

व्हिडीओ नक्की बघा :

सायकलच्या चाकापासून डायनिंग टेबल तयार करणाऱ्या तरुणाचे नाव अब्दुल, असे आहे. त्याने कोशिंबीर, फिश करी, डाळ व उकडलेली अंडी यांसारखे विविध प्रकारचे पदार्थ सायकलच्या चाकावर मांडले आहेत. चाक फिरविताच प्रत्येक पदार्थ त्याच्यासमोर येतो आणि तो जेवणाचा आनंद घेताना दिसतो. तरुणाने स्टायलिश डायनिंग टेबलची रचना लक्षात ठेवून, हुबेहूब फाइव्ह स्टार हॉटेलसारखे आकर्षक डायनिंग टेबल तयार केले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jolil7565 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे खास डायनिंग टेबल पाहून नेटकरी मजेशीर कमेंट करताना, तर काही या अनोख्या डायनिंग टेबलचे कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘मजेशीर पण उत्तम कल्पना आहे’ , ‘फाइव्ह स्टार हॉटेलसारखे डायनिंग टेबल’ अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

Story img Loader