सोशल मीडियावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. डान्स, मारामारी आणि रील्सचे व्हिडीओ नक्कीच व्हायरल होतात. यासोबतच जुगाडचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. कधी कोणी स्वत:च्या घरात घरगुती पद्धतीने वॉशिंग मशीन बनवतो, तर त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो; तर कोणी दुचाकीला पंखा लावून आपली युक्ती दाखवतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता जुगाडचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
भारतातील लोक आणि जुगाड याचा काही नेम नाही. देशात जुगाडू लोकांची कमतरता नाहीये. लोक असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरून मोठ्या मोठ्या गोष्टीही ठीक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय, हा जुगाडाचा व्हिडीओ भारतातील लोकांचा नव्हे तर भारताच्या शेजारील पाकिस्तानी तरुणांचा आहे.
हा व्हायरल व्हिडिओ भारताचा शेजारी देश पाकिस्तानातला आहे. पाकिस्तान देश बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. यावेळी पाकिस्तानचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे की, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
(हे ही वाचा : ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; महिलेची पर्स चोरी करुन पळत होता चोर, नंतर १४ सेंकदात घडलं असं की, VIDEO व्हायरल )
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?
जेव्हा लोक उष्णतेमुळे त्रासलेले असतात किंवा मजा करायची असते, तेव्हा ते स्विमिंग पूलवर जातात. पण, तुम्ही कधी चालत्या ट्रकच्या आत स्विमिंग पूल पाहिला आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असाच जुगाड पूल दिसत आहे. वास्तविक काही मुलांनी ट्रक एका ठराविक उंचीपर्यंत पॉलिथिनने झाकून ठेवला आहे. यानंतर त्यांनी त्यात पाणी भरले आणि नंतर स्विमिंग पूलचा आनंद लुटला. ट्रक रस्त्यावरून फिरतोय आणि त्यात मुलं मस्ती करत आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर truckawaly_vlogs नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडीओला आठ लाख ३६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “पाकिस्तानी लोकांकडे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठीही पैसे नाहीत.” आणखी एका युजरने लिहिले, त्यांच्या अशा जुगाडामुळे खांबाच्या वायरला स्पर्श होण्याची भीती आहे. तिसऱ्या युजरने लिहिले, “भाऊ अंघोळ करा, पण रस्त्यावर पाणी फेकू नका, लोकांना त्रास होतो.” चौथ्या युजरने लिहिले, “हा पाकिस्तानचा स्विमिंग पूल आहे”, आणखी एका युजरने लिहिले, “हे पाकिस्तानच्या शेखपुरा येथील आहे.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.