सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणी कारपासून हेलिकॉप्टर बनवतंय, तर कधी जुगाड करीत विटांपासून कूलर बनवतंय. आता असाच एक जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीनं नळातील पाण्याचा प्रेशर वाढवण्यासाठी एक भन्नाड जुगाड केला आहे. त्याचा हा जुगाड पाहून सगळेच हैराण झाले आहेत. त्या व्यक्तीनं पाण्याचा प्रेशर वाढवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर केला आहे. त्याचा हा जुगाड अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नळातून प्रेशरने पाणी येण्यासाठी केला प्लास्टिक अन् काही वस्तूंचा वापर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती नळाच्या खाली एक बादली ठेवून पाणी भरत असते. पण, पाण्याचा प्रेशर खूपच कमी असल्यानं त्याला पाणी भरण्यास बराच वेळ लागतो. यावेळी तो डोकं वापरत बाटली व काही वस्तूंच्या मदतीनं पाण्याचा प्रेशर वाढवतो. तरुणाचा हा जुगाड पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असा जुगाड आपल्याला का नाही सुचला. तरुणानं नळावर पाण्याची बाटली अशा पद्धतीनं फिट केली आहे की, ज्यामुळे नळातून धो-धो पाणी वाहू लागतं. त्यामुळे तुमच्याही घरात अशा प्रकारे कमी दाबानं पाणी येत असेल, तर हा जुगाड तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

हा व्हायरल जुगाड व्हिजीओ @ViralXfun नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हाय-टेक स्मार्ट वॉटर टँक. हा जुगाड युजर्सनाही फार आवडला आहे. त्यामुळे युजर्स व्हिडीओवर खूप कमेंट करीत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, ही जादू आहे; फिजिक्स नाही. तर दुसर्‍यानं हा जुगाड खरंच कामी येईल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय तिसर्‍यानं लिहिलंय, यानं कमाल केली. पण, या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून सांगा.