पूर्वी शेतकरी आपल्या पिकाचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या मध्यभागी माणसाच्या आकाराचे बुजगावणे उभे करायचे. मात्र बुजगावण्याचा म्हणावा असा प्रभाव पक्ष्यांवर पडत नसल्याचं एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने भन्नाट असा देशी जुगाड केला आहे. ज्यामुळे आता पक्षी त्याचया शेताच्या आसपासही फिरकत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावाकडे राहणाऱ्या लोकांना पक्षी, गायी, म्हैस यांसारख्या प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान होण्याचा धोका किती मोठ्या प्रमाणात असतो हे माहिती आहे. शिवाय या प्राण्यांपासून किंवा पक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी दिवसभर शेतात थांबणं कठीणं असतं. अशातच आका शेतकऱ्याने असं जुगाड केलं आहे जे पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी मदत करेल यात शंका नाही.

हेही पाहा- मोबाईल फोडला, हात उगारला अन्…, रिक्षा चालकाने तरुणासोबत केलेल्या गैरवर्तनाचा Video पाहून नेटकरी संतापले

पिकाचे संरक्षण करण्यासाठी देशी जुगाड –

पक्ष्यांनी शेतातील पिकांची नासाडी करू नये यासाठी शेतकऱ्याने अनोखे यंत्र वापरले आहे. हे उपकरण शेतात सतत मोठमोठ्याने वाजत राहते, त्यामुळे पक्षी दूर पळून जातात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्याव्हिडिओमध्ये शेताच्या मधोमध चिमण्यांना पळवण्यासाठी पंख्याच्या यंत्राचा वापर केल्याचे दिसून येते. पंख्याच्या मोटारीला लोखंडी साखळी बांधलेली असते, पंखा फिरु लागल्यावर साखळी रिकाम्या स्टीलच्या डब्यावर जोरात आदळत त्यामुळे मोठा आवाज येतो.

हेही पाहा- भाजीविक्रेता रात्रीत बनला १७२ कोटींचा मालक! आता पोलिस ठाण्याच्या मारतोय चकरा; का ते जाणून घ्या

या जुगाडू यंत्राचा मोठा आवाज ऐकून शेतातील पक्षी उडून जातात. या शेतकऱ्याच्या एका युक्तीमुळे आता त्याच्या कुटुंबातील सदस्याला दिवसभर शेतात उभे राहण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्याच्या या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ लाईफ हॅक्स नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सोपा मार्ग…’ सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून अनेकजण व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi jugaad to protect the crop from the birds the farmer did an extraordinary trick video viral jap
Show comments