देसी जुगाड संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर या युक्तींना चांगलीच दाद मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका साध्या तंत्राचा वापर करून व्यक्तीने पाण्याचा प्रवाह कमी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. मात्र हे पाणी जपून वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पाण्याचा वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पाणी जपून वापरतात. पण अनेकदा शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकरी असे देसी जुगाड वापरून आपल्या समस्या सोडवतात. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. नेटकरी शेतकऱ्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्याने पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी देसी जुगाड वापरला आहे. शेतात पिकांना पाणी पोहोचण्यासाठी नाले केले आहेत. पाणी भरभर यातून वाहून जाऊ नये यासाठी शेतकऱ्याने एक युक्ती वापरली आहे. शेतकऱ्याने पॉलिथिन पिशवीत पाणी भरून पाण्याच्या प्रवाहासमोर ठेवले आहे. पिशवीसह पाणी हळू हळू सरकत असल्याचे दिसते, जेणेकरून सर्व पिकांना हळूहळू पुरेसे पाणी मिळेल.
पाण्याचे वजन वापरून शेतकऱ्याने आपल्या शेतीचा प्रश्न सोडवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १८ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच ४५ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे.