Auto Driver Used Amazing Trick To Earn Extra Money Video Viral : आयुष्यात प्रत्येकालाच भरपूर पैसा कमवायचा आहे. त्यासाठी लोक रात्रीचा दिवस करतात. पैशासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. काहींना भरपूर पैसा कमावून झटपट श्रीमंत व्हायचे असते. त्यामुळे मला आयुष्यात पैसा कमवायचा नाही, असे म्हणणारे फार क्वचितच लोक सापडतील. त्यात आपल्या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही. काही लोक पैसे वाचवण्यासाठी, तर काही जण पैसे कमावण्यासाठी जुगाड वापरतात. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण म्हणतात ना, पैसा कमावण्यासाठी तुम्हाला कोणी आयती संधी देत नाही, ती स्वत:हून निर्माण करावी लागते. अशाच प्रकारे एका रिक्षाचालकाने पैसा कमावण्यासाठी असा एक जुगाड केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही अवाक् व्हाल. अशा प्रकारे पैसा कमावता येऊ शकतो, असा कोणी विचारही केला नसेल.
रस्त्यावर चालताना अनेकदा पायाखाली लोखंडी खिळे, नट-बोल्ट्स आणि इतर लहानसहान लोखंडी वस्तू पडलेल्या दिसतात. अनेकदा तर त्या वस्तू चपलेतही अडकतात; पण त्या बाजूला करून आपण निघून जातो. पण, याच गोष्टीचा विचार करून एका रिक्षाचालकाने पैसे कमावण्याचा मार्ग शोधला आहे. चालकाने त्याच्या रिक्षाच्या खालच्या बाजूला अनेक लोहचुंबक अडकवून ठेवले आहेत. त्यामुळे कोणत्याही रस्त्यावरून जाताना तिथे पडलेले लोखंड त्या लोहचुंबकाला चिकटते; जे नंतर तो विकतो आणि पैसे कमावतो. अशा प्रकारे तो दिवसाला ३०० ते ४०० रुपये कमावतो; ज्यातून त्याचा डिझेलचा खर्च निघतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रिक्षाखाली अडकवलेले लोहचुंबक काढताना दिसतोय. त्या लोहचुंबकाला भरपूर लोखंडी खिळे आणि इतर गोष्टी चिकटलेल्या दिसतायत. त्याबाबत तो चालक व्हिडीओत सांगतोय की, मी माझ्या गाडीने रोज ४०-५० किलोमीटर दूरवरून येतो. त्यामुळे मी माझ्या गाडीखाली लोहचुंबक बसवले आहे; ज्यावर रस्त्यावर पडलेले लोखंड चिकटते आणि मला यातून माझा डिझेलचा खर्च भागवता येतो.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Bro is cleaning the road and making money at the same time ? pic.twitter.com/5g8IEwua0j
— Rishi Bagree (@rishibagree) May 20, 2024
पैसा कमावण्याचा हा भन्नाट जुगाडचा व्हिडीओ @rishigree एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘व्यक्ती एकाच वेळी रस्ते स्वच्छही करीत आहे आणि पैसेही कमवत आहे’, असे लिहिले आहे. दरम्यान, पैसे कमावण्याची चालकाची ही आयडिया अनेकांना आवडली आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “ही एक चांगली कल्पना आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “त्या व्यक्तीने त्याच्या मेंदूचा पुरेपूर वापर केला आहे.” तिसऱ्या एका युजरने लिहिले, “त्याने त्याची ही कल्पना कॉपीराइट केली पाहिजे.”