Desi Jugaad Video : सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी व्हायरल होत असते. कधी मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात; तर कधी अनोख्या पोस्ट आणि मेसेजचे स्क्रीनशॉट व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे; ज्यातील चालकाची बंद कार ढकलण्याची पद्धत पाहून युजर्स चकित झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर दोन कार संथ गतीने जात आहेत. बघताना असे वाटते की, एकामागोमाग एक या कार जात आहेत; पण प्रत्यक्षातील दृश्य मात्र काही वेगळेच होते. पुढची कार बंद पडल्याने मागच्या दुसऱ्या कारच्या मदतीने ती कार ढकलली जात आहे. मात्र, दोरी वगैरे बांधून ही कार पुढे नेली जात नाही, तर चक्क पायाने धक्का देत ती पुढे नेली जात आहे. एक व्यक्ती मागच्या कारवर बसून पायाने बंद कारला धक्का देतेय. गाडीच्या बोनेटवर ती व्यक्ती बसली आहे आणि तिने आपला पाय समोरच्या कारवर ठेवला आहे. अशा प्रकारे तो बंद कार त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जात आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shocking video in mumbai Waseem Amrohis Car Was Broken Into By Thieves Who Were Trying To Steal His Phone And Laptop Video Viral
तुम्हीही कार पार्क करुन बिनधास्त निघून जाता? अवघ्या सेंकदात बंद कारमध्ये कशी करतात चोरी पाहा; मुंबईतला VIDEO पाहून धक्का बसेल
Friends fun on road caused accident of one of them brutal accident video viral on social media
असा मित्र नसलेलाच बरा! भररस्त्यात मित्राचा पाठलाग केला, वेगात गाडी आली अन्…, पुढच्या क्षणी जे झालं ते धक्कादायक, पाहा VIDEO
E-Rickshaw Shocking Stunt video viral
भररस्त्यात ई-रिक्षाबरोबर जीवघेणी स्टंटबाजी, रिक्षा उलटताच चालकानं केलं असं काही की…; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

बंद कार चालू करण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड

Read More Trending News : टी-शर्टला पकडून शिवीगाळ अन्…; अपंग प्रवाशाला ट्रेनमधून बाहेर काढण्यासाठी रेल्वे गार्डचे धक्कादायक कृत्य, Video पाहून लोकांचा संताप

हा व्हिडीओ @Delhiite_ नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना, ‘भारत नवशिक्यांसाठी नाही’, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आता युजर्सनाही भारी आवडला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, जुगाड टॅलेंट फक्त भारतात आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, भारतात काहीही होऊ शकते. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, याने कोणती नशा केली आहे? चौथ्या युजरने लिहिले आहे की, Amazing game. आणखी एका युजरने लिहिले आहे की, आम्ही काहीतरी नवीन प्रयोग करीत आहोत.

Story img Loader