जुगाड ही एक अशी कला आहे जी माणूस स्वतःहून शिकतो, आणि असे जुगाड करण्यात भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. मात्र, जुगाड ही कला आता जगभरात पसरली आहे आणि लोक त्याचा दैनंदिन जीवनातही वापर करत आहेत. प्लंबर, मेकॅनिक आणि अनेक गोष्टींवर खर्च करण्यापूर्वी बहुतेक घरात काही ना काही जुगाड करुन वस्तूंचा वापर करतात. आता या व्हायरल व्हिडीओमध्येच पाहा ना, एका व्यक्तीने सामान्य सीसीटीव्ही कॅमेरा विकत आणला होता. पण हा कॅमेरा फिरता असावा असे त्याला वाटत होते.
पण आता सीसीटीव्ही कॅमेरा ३६० डिग्रीवर फिरता ठेवण्यासाठी खर्च कशाला करायचा म्हणून व्यक्तीने असा एक देसी जुगाड केला जो पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. व्यक्तीने पंख्याच्या मोटारीचा वापर करुन चक्क फिरता सीसीटीव्ही कॅमेरा तयार केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पंख्याच्या मोटारीपासून तयार केला अप्रतिम जुगाड
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीने ३६० डिग्री कॅमेरा विकत न घेता टेबल फॅनच्या फिरत्या मोटरच्या मदतीने सामान्य सीसीटीव्ही कॅमेराला ३६० कॅमेरामध्ये बदलले आहे. यासाठी त्या व्यक्तीने प्रथम पंख्याची मोटार भिंतीवर लावली आणि नंतर त्यावर सामान्य सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. यामुळे पंख्याच्या मोटारीवर फिट केलेला कॅमेराही मोटारीबरोबर फिरत राहिला. अनेकांना हा देसी जुगाड फार आवडला आहे. तर काहींनी यामुळे विजेचे बिल वाढणार असल्याचे म्हटले आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्राम हँडल world_of_engineering_75 वरून पोस्ट करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत १२.५ दशलक्ष (एक कोटीहून अधिक) व्ह्यूज आणि ५ लाख ८२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एवढेच नाही तर साडेतीन हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ते ३० टक्के इंजिनियरिंग आणि ७० टक्के कॉमन सेंस आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका युजरने लिहिले की, भाऊ… यामुळे विजेचे बिल वाढेल. तर काहींनी हा जुगाड भारताबाहेर जाऊ नये असे सांगितले.